Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Crime: बारामती पोलिसांचा थेट मुळावरच घाव; फटाका सायलेंसर विकणाऱ्या दुकानांमधूनच १६ सायलेन्सर जप्त

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गेली अनेक महिन्यांपासून वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना अनेक कारवाया करत लाखो रुपयांचा दंड वसुल केला आहे.  

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 22, 2025 | 02:35 AM
Baramati Crime: बारामती पोलिसांनी घातला थेट मुळावरच घाव; फटाका सायलेंसर विकणाऱ्या दुकानांमधूनच १६ सायलेन्सर जप्त

Baramati Crime: बारामती पोलिसांनी घातला थेट मुळावरच घाव; फटाका सायलेंसर विकणाऱ्या दुकानांमधूनच १६ सायलेन्सर जप्त

Follow Us
Close
Follow Us:

बारामती: बारामती वाहतूक पोलिसांनी आता फटाका बुलेटवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे असतानाच आता वाहतूक शाखेने फटाका सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकानांवरच कारवाई करत तब्बल १६ फटाका सायलेंसर ताब्यात घेत थेट मुळावरच घाव घातला आहे. त्यामुळे सायलेंसर विक्री करणाऱ्या दुकान चालकांनी मोठा धसका घेतला आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गेली अनेक महिन्यांपासून वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना अनेक कारवाया करत लाखो रुपयांचा दंड वसुल केला आहे.  ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, प्रदीप काळे, अजिंक्य कदम, प्रज्योत चव्हाण, सीमा घुले, स्वाती काजळे, रेशमा काळे, रूपाली जमदाडे, माया निगडे, सीमा साबळे आदींनी केली आहे.

एकाच दिवसात ११ मोठ्या सायलेंसरवर कारवाई

फटाका सायलेंसरवर कारवाई करण्याची मोहीम सुरु असताना आज दि. १८ रोजी एका दिवसात कसबा, भिगवण चौक, नेवसे रोड, इंदापूर चौक परिसरात ११ बुलेट चालकांकडून मोठ्या आवाजाचे सायलेंसर जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बुलेट गाड्या वापरणाऱ्या चालकांना आता सायलेंट सायलेंसर वापरावे लागणार आहेत.

1 लाखाची लाच स्वीकारणं भोवलं; बारामतीच्या नगररचनाकाराला रंगेहात पकडले

1 लाखाची लाच स्वीकारणं नगररचनाकाराला  भोवलं

बारामती शहरातील बांधकाम व्यवसायाकडून गृह प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यातील एक लाख रुपये रकमेची लाच स्वीकारताना बारामती नगर परिषदेचे नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे. या कारवाईमुळे बारामती शहरात खळबळ उडाली आहे.

बारामती शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातील रुई याठिकाणी निर्मिती विहार इमारत बी विंग १, या गृह प्रकल्पाचा प्रस्ताव बारामती नगर परिषदेच्या नगररचना विभागाकडे मंजुरीसाठी दाखल केलेला आहे. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी नगररचनाकार विकास ढेकळे यांनी तक्रारदारांना दोन लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबतची तक्रार १९ मार्च २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने केली. दरम्यान तडजोडीअंती १ लाख ७५ हजार रुपयांची मागणी नगर रचनाकार ढेकळे यांनी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनंतर या विभागाने तक्रारीची पडताळणी केली, त्यानुसार तक्रारदाराने १ लाख ७५ हजार रुपये रकमेपैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले.

Web Title: 16 silencers seized from shops selling firecracker silencers by baramati police crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • baramati news
  • Baramati Police
  • crime news

संबंधित बातम्या

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण… लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 
1

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण… लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 

Baramati Plane Crash Breaking: बारामतीत पुन्हा विमान अपघात;सुदैवाने वैमानिक सुरक्षित
2

Baramati Plane Crash Breaking: बारामतीत पुन्हा विमान अपघात;सुदैवाने वैमानिक सुरक्षित

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…
3

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

दुसऱ्या लग्नाला विरोध; संतापलेल्या माजी सैनिक वडिलांनी मुलावर झाडली गोळी, नंतर स्वतःलाही संपवलं
4

दुसऱ्या लग्नाला विरोध; संतापलेल्या माजी सैनिक वडिलांनी मुलावर झाडली गोळी, नंतर स्वतःलाही संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.