Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमसंबंधात आडवा आला म्हणून 17 वर्षांच्या मुलाची हत्या; इन्स्टाग्रामवरून संपर्क केला अन्…

समीरने जोहरानला त्याच्या गर्लफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगितले होते आणि न ऐकल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवस जोहरान शांत राहिला. पण नंतर त्याने इन्स्टाग्रामवर त्या किशोरवयीन मुलीला मेसेज करण्यास सुरुवात केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 07, 2026 | 08:54 AM
प्रेमाचा त्रिकोण : १७ वर्षीय मुलाची हत्या

प्रेमाचा त्रिकोण : १७ वर्षीय मुलाची हत्या

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच नागपुरातील कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक हत्याकांड घडले. प्रेमत्रिकोणातून एका 17 वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मृत मुलाची ओळख वाजपेयी नगर येथील रहिवासी जोहरान मुस्तफा शेख (वय १७) अशी आहे. पोलिसांनी यशोधरानगर येथील रहिवासी १७ वर्षीय समीर (नाव बदलले आहे) आणि त्याच्या दोन मित्रांनाही ताब्यात घेतले आहे. या सर्वांनी शाळा सोडली होती आणि ते रोजंदारीवर काम करत होते. सुमारे वर्षभरापूर्वी जोहरानचे एका किशोरवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ते बराच काळ एकत्र होते, पण मुलीने ही गोष्ट समीरला सांगितली, ज्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला.

समीरने जोहरानला त्याच्या गर्लफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगितले होते आणि न ऐकल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. काही दिवस जोहरान शांत राहिला, पण नंतर त्याने इन्स्टाग्रामवर त्या किशोरवयीन मुलीला मेसेज करण्यास सुरुवात केली. हे कळताच, समीरने त्याच्यासाठी जाळे टाकले.

4-5 महिन्यांपूर्वी समीरशी मैत्री

४-५ महिन्यांपूर्वी त्या मुलीची समीरशी मैत्री झाली. तिने त्याला सोडून दिले आणि त्याच्याशी बोलणे बंद केले. असे असूनही, जोहरान त्या मुलीशी बोलण्याचा आणि तिला भेटण्याचा प्रयत्न करत राहिला.

इन्स्टाग्रामवरून केला संपर्क

मंगळवारी रात्री १० वाजता, समीरने जोहरानच्या इन्स्टाग्राम आयडीवरून त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला अशरफी मशिदीमागील मैदानात भेटायला बोलावले. जोहरान तिथे पोहोचताच, तिन्ही आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. चाकू आणि धारदार शस्त्राने त्याच्या मानेवर, डोक्यावर आणि कानांवर वार करून त्याला ठार मारले. तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

कळमना पोलिस घटनास्थळी

रात्री ११:३० वाजता, नागरिकांना जोहरान जखमी आणि रक्ताने माखलेला आढळला. त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच, कळमना पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत जोहरानचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना समीरच्या इन्स्टाग्राम आयडीवरून सुगावा लागला. बुधवारी, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

‘माझ्या नराधम बापाला फाशीच द्या’; पर्वती अत्याचार प्रकरणातील आईचा टाहो, चिमुरडीने सांगितलेला थरार ऐकून जळेल काळजाचं पाणी

Web Title: 17 year old boy murdered in love triangle in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.