Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आई आणि लिव्ह-इन पार्टनर झाले हैवान; 18 महिन्यांच्या बाळाच्या बरगड्या मोडल्या, शरीरावर 51 जखमांचे निशाण, पोस्टमॉर्टममधून खुलासा

18 महिन्यांच्या मासूम बाळाच्या मृत्यूप्रकरणी पोस्टमॉर्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिमुकल्याच्या शरीरावर तब्बल 51 जखमांचे निशाण आढळले असून, बरगड्याही मोडल्याचे उघड झाले आहे. आई आणि तिच्या लिव्ह-इन पार्टनरने अमानुष छळ केल्याचा आरोप असून, या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 03, 2026 | 01:41 PM
आई आणि लिव्ह-इन पार्टनर झाले हैवान; 18 महिन्यांच्या बाळाच्या बरगड्या मोडल्या, शरीरावर 51 जखमांचे निशाण, पोस्टमॉर्टममधून धक्कादायक खुलासा

आई आणि लिव्ह-इन पार्टनर झाले हैवान; 18 महिन्यांच्या बाळाच्या बरगड्या मोडल्या, शरीरावर 51 जखमांचे निशाण, पोस्टमॉर्टममधून धक्कादायक खुलासा

Follow Us
Follow Us:
  • मासूमावर क्रूरतेचा कळस!
  • 18 महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी पोस्टमॉर्टमने उघड केली भीषण सत्यता
  • आई आणि लिव्ह-इन पार्टनर झाले हैवान
Child Abuse Case in Kerala: केरळमधील तिरुवनंतपुरममधून एक धक्कादायक घटना समोर येते. १८ महिन्यांच्या बाळाच्या भीषण मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. पोस्टमॉर्टम अहवालातील धक्कादायक खुलासे वाचून कोणाच्याही अंगावर काटा येईल. पोस्टमॉर्टम अहवालानुसार, बाळाच्या शरीरावर तब्बल 51 जखमा आढळून आल्या आहेत. या घटनेनंतर एकच प्रतिक्रिया उमटत आहे, ती म्हणजे या निष्पाप जीवाची काय चुक होती?

अहवालात असे उघड झाले आहे की, बाळावर वारंवार आणि निर्घृणपणे शारीरिक अत्याचार करण्यात आले होते. यानंतर, बाळाची आई अखिला आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर अशकार यांना अटक करण्यात आली असून, पोलीसांकडून या प्रकरणाची जवळच्या नातेवाईकांची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपी अशकारविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळावर दीर्घकाळ शारीरिक अत्याचार करून नंतर त्याची हत्या करण्यात आली.

Uttarpradesh Crime: प्रयागराजमध्ये करोडपती कुटुंबातील चौघांचे संशयास्पद मृत्यू, भिंतीवर ‘सुनेने मारले आहे’; थरारक प्रकरण!

शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक खुलासे

शवविच्छेदन अहवालात असे उघड झाले आहे की, त्या निष्पाप १८ महिन्यांच्या बाळाच्या शरीरावर जखमांच्या ५१ खुणा होत्या. अहवालात म्हटले आहे की, छाती आणि डोक्याला झालेल्या गंभीर जखमांमुळे बाळाचा मृत्यू झाला. मुलाच्या सात बरगड्या मोडल्या होत्या, त्याला अंतर्गत दुखापत झाली होती आणि कवटीच्या आत अनेक ठिकाणी रक्तस्त्राव व सूज आली होती. तपासात असे उघड झाले की, आरोपी अशकरने मुलाच्या छातीवर पाय ठेवल्यामुळे अंतर्गत अवयव आणि बरगड्यांना गंभीर इजा झाली होती.

मुलाच्या गुप्तांगावर आणि उजव्या पायाच्या तळव्यावर भाजल्याच्या खुणाही आढळल्या. या जखमा सिगारेट आणि लायटरमुळे झाल्या होत्या. या जखमांमुळे मुलावर वारंवार अत्याचार होत असल्याचे पोलिसांचे मत आहे.

आईच बनली हैवान

मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी मुलाच्या हाताची हाडेही मोडली होती. याबद्दल अशकर आणि मुलाची आई अखिला यांची चौकशी केली असता, आईने दावा केला की मुलगा जिन्यावरून पडला होता. मात्र पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी अखिला आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर अशकर यांना अटक केली आहे.

Mira Bhayandar Crime : चार वर्षीय मुलाच्या मृत्यूचे गूढ उलगडले! आईच्या प्रियकराकडून हत्या; मृतदेह नाल्यात फेकून अपघाताचा बनाव

अशकरने गुन्ह्याची कबुली दिली असून चौकशीदरम्यान, अशकरने तिरुवनंतपुरम पोलिसांना सांगितले की, तो मुलगा अखिलासोबतच्या त्याच्या नात्यात अडथळा बनला होता. हा अत्याचार हेतुपुरस्सर रचलेला कट होता की या प्रकरणात आणखी काही नवीन वळण आहे, याचा तपास पोलीस आता करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशकरने यापूर्वी आपल्या पहिल्या पत्नीला निर्घृणपणे मारहाण करून तिला शारीरिकदृष्ट्या अपंग केले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपासही अधिक तीव्र केला आहे.

Web Title: 18 month old baby abuse 51 injuries mother live in partner postmortem revelation child abuse case in kerala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • crime
  • Kerala
  • police

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.