crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आईने अभ्यास करण्यासाठी रागावले म्हणून १८ वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करण्याऱ्या मुलीचे नाव विशाखा अनिल वक्ते असे आहे. तिने नुकताच नर्सिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश केला होता. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी भागात घडली आहे. विशाखा ही १८ वर्षाची असून नर्सिंगच्या अभ्यासक्रमात नुकतीच दाखल झाली होती. सध्या पहिल्या वर्षात ती शिक्षण घेत होती. १४ सप्टेंबरला रोजी संध्याकाळी ती घरात टीव्ही पाहत होती. यावेळी तिच्या आईने तिला अभ्यासाकडे लक्ष दे असं सांगितलं. यावरून तिचा राग अनावर झाला आणि विशाखाने थेट तिसरा मजला गाठला. काही क्षणातच तिने जिन्याजवळील छताला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.
आई स्वयंपाकघरात, तर लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत असल्याने विशाखाने गळफास घेतल्याचं कुणालाच कळलं नाही. काही काळाने कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर आरडाओरडा झाली आणि तातडीने तिला खाली उतरवून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले.
या प्रकरणानतंर रुग्णालयात कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. “इतक्या किरकोळ कारणावरून मुलगी असं टोकाचं पाऊल उचलेल, असा विचारही केला नव्हता,” असं नातेवाईकांनी सांगितलं. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी घरच्यांना फोन करून म्हंटल…
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथून आत्महत्येची धक्कादायक घटना गेल्या मंगळवारी घडली होती. एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘मम्मी, दादा, आजी-आजोबा, मला माफ करा’ असं लिहिलेलं होत. ब्लॅकमेलिंगच्या तणावातून तरुणीने टोकाचं पाऊल उटलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
आत्महत्येच्या आदल्या दिवशी निकिताने तिच्या कुटुंबीयांना फोन करून एक महत्त्वाची माहिती दिली होती. तिने सांगितले होते की, ‘तुमच्या मोबाइलवर एक फोन येईल, तो ब्लॅकलिस्टमध्ये टाका, त्याचा फोन घेऊ नका.’ असे असूनही, तिच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फोनवर अनोळखी क्रमांकावरून 25 कॉल आले होते.