Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळात अनैतिक संबंधातून 22 वर्षीय तरुणाची हत्या; कोयत्याने सपासप वार केले अन्…

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वैभव सातकर व आरोपी अंकुश सातकर दोघे शेजारी राहत असून, मयत वैभव सातकर याचे अनैतिक संबंध असल्याने आरोपी अंकुश सातकर याने धारदार कोयत्याने वैभव याच्या मानेवर अनेक वार केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 02, 2025 | 08:45 AM
विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; लेकाला मिळाली बापाची साथ

विम्याचे दोन कोटी हडपण्यासाठी जीवंत असतानाच केला तेरावा; लेकाला मिळाली बापाची साथ

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात अनैतिक संबंधातून एकाने 22 वर्षीय तरुणावर कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना मंगळवारी (दि.1) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास शनि मंदिराजवळ आंबेवाडी कान्हे (ता. मावळ) येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वैभव उमेश सातकर (वय 22, रा. आंबेवाडी कान्हे, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंकुश जयवंत सातकर (वय 42, रा. आंबेवाडी कान्हे ता. मावळ) असे खून केलेल्या आरोपीचे नाव आहे. वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वैभव सातकर व आरोपी अंकुश सातकर दोघे शेजारी राहत असून, मयत वैभव सातकर याचे अनैतिक संबंध असल्याने आरोपी अंकुश सातकर याने धारदार कोयत्याने वैभव याच्या मानेवर अनेक वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेला.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते व पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केला. याप्रकरणी पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करत आहे.

प्रेमप्रकरणातून तरूणाची निर्घृण हत्या

दुसऱ्या घटनेत, वाशिमच्या शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चांडस येथे प्रेमप्रकरणातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. महेश रुपराव हाडे (वय 35, रा. गोहगाव हाडे) असे तरुणाचे नाव असून, ही घटना रविवारी (दि. 9) घडली. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यापैकी 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मृतकाच्या भावाने सोमवारी (दि. 10) शिरपूर पोलिसात तक्रार दिली आहे.

Web Title: 22 years old youth murdered over immoral relationship in maval nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • Immoral Relationship
  • maval news
  • Murder Case
  • Youth Murder

संबंधित बातम्या

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला
1

मावळ तालुक्यात खळबळ; झोपेत असलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता
2

पाटणात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; शवाचे 3 तुकडे करुन रेल्वे ट्रॅकवर फेकले, शीर अजूनही बेपत्ता

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह
3

Mumbra News : ‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह

गेम खेळण्यावरून झाला वाद; मामाने भाच्याला संपवलं, चाकूने गळाच चिरला
4

गेम खेळण्यावरून झाला वाद; मामाने भाच्याला संपवलं, चाकूने गळाच चिरला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.