Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Swargate Bus Depot : ‘त्या’ नराधमाचा क्रूर चेहरा समोर…, स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार प्रकरणातील नराधमाचा फोटो आला समोर

pune shivshahi Crime news: पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधमाचा फोटो समोर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 26, 2025 | 04:56 PM
स्वारगेट अत्याचारप्रकरणी राजकीय स्तरावर तीव्र पडसाद

स्वारगेट अत्याचारप्रकरणी राजकीय स्तरावर तीव्र पडसाद

Follow Us
Follow Us:

pune shivshahi Crime Marathi: पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आज (26 फेब्रुवारी) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून आरोपी फरार आहे. पोलिसांनी चौकशीसाठी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले आहे. या घटनेतील आरोपीचा फोटो समोर आला असून दत्तात्रय रामदास गाडे असे या नराधमाचे नाव आहे.

Pune News : “तर तिला मदत मिळू शकली असती पण…”; स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचार प्रकरणावर पोलिसांची प्रतिक्रिया

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचा फोटो समोर आला आहे. या प्रकरणी आठ टीम कडून आरोपीचा शोध सुरु आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दत्तात्रेय गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे.या अगोदर दत्तात्रयवर शिरुर पोलिस स्थानकात चोरीचे, साखळी चोरल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सराईत गुन्हेगार हा स्वारगेट स्थानकात वावरत होता. महाशिवरात्रीच्या सकाळी 5.30 वाजता ते 5.45 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दत्तात्रेयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लैंगिक अत्याचारसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीच्या मागावर पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहे.

या घटनेनंतर त्या तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला.अत्याचारानंतर ती तरुणी बसमधून बाहेर पडली आणि दुसऱ्या बसमध्ये चढली. तिथून ती फलटणला आपल्या गावी गेली. तिकडे तिने आपल्या नातेवाईकांना आपल्यासोबत घडलेला सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबायांनी या प्रकाराची तक्रार पोलिसांत दाखल केली.

नेमकं काय घडलं?

पुण्याहून फलटणला जाण्यासाठी तरुणी स्वारगेट बस डेपोत आली होती. या पीडित तरुणीने आरोपीला फलटणला जाणाऱ्या बसबाबत विचारणा केली. याच प्रश्नाने पीडितेचा घात केला. आरोपी दत्तात्रय गाडेने याचाच फायदा घेतला. आरोपीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिला विश्वासात घेतले आणि जवळ उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसमध्ये घेवून गेला. बस बंद बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतरही आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि लगेचच तिथून फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे आणि त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.

स्वारगेट अत्याचार प्रकरणावरुन रोहित पवार आक्रमक; खासदार मुरलीधर मोहोळांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

Web Title: 26 yr old woman waiting for bus at swargate bus depot raped in shivshahi bus photo of man accused of assaulting girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • crime
  • police
  • Pune

संबंधित बातम्या

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण
1

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा
4

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.