Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामती हादरलं ! पणदरेत 30 वर्षीय विवाहितेची हत्या; डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने वार केले अन् नंतर…

अज्ञात कारणातून त्यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर कसल्यातरी हत्याराने मारहाण करण्यात आली. त्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 13, 2026 | 09:36 AM
पणदरेत ३० वर्षीय विवाहितेचा घरात खून; अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा

पणदरेत ३० वर्षीय विवाहितेचा घरात खून; अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा

Follow Us
Follow Us:

माळेगाव : बारामती तालुक्यातील पणदरे येथे घरातील खोलीत ३० वर्षीय विवाहितेचा डोक्यात व चेहऱ्यावर हत्याराने वार करून तसेच टॉवेलने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.१२) रात्री उघडकीस आली. या घटनेने पणदरे परिसरात खळबळ उडाली असून, माळेगाव पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

वैशाली तानाजी पवार (वय ३०, रा. पणदरे, ता. बारामती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या सासू रंजना लक्ष्मण पवार (वय ५०, रा. खडकआळी, पणदरे) यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीच ते रात्री ७.४५ वाजण्याच्या दरम्यान पणदरे गावच्या हद्दीत तानाजी लक्ष्मण पवार यांच्या राहत्या घरातील खोलीत वैशाली पवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. अज्ञात कारणातून त्यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर कसल्यातरी हत्याराने मारहाण करण्यात आली. त्यानंतर टॉवेलने गळा आवळून त्यांचा खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर महिलेचा पती कामासाठी वडगाव निंबाळकर या ठिकाणी गेला होता, रात्री तो घरी आल्यानंतर, पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. खून करण्यासाठी नेमके कोणते हत्यार वापरण्यात आले, तसेच हल्ल्यामागील कारण काय, याचा तपास सुरू आहे.

पुण्यात गणेशोत्सवातील ‘तो’ मुद्दा पेटणार? विद्यानंद बापटांची थेट पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त आणि महापालिकेला नोटीस

याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस उपनिरीक्षक ओमासे यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.

Baramati News : पिस्तुल काढले अन् डोक्यात झाडली गोळी; गोळीच्या आवाजाने अपार्टमेंट हादरले,२८ वर्षीय तरुण गंभीर

Web Title: 30 year old married woman murdered in panadare baramati taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Baramati Crime
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
1

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं
2

जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार! दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला कोयत्याने वार करुन संपवलं

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी
3

लाचखोर पोलिस एसीबीच्या जाळ्यात; कारवाईनंतर काही तासांतच दिली उपनगराध्यक्षांना धमकी

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल
4

कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने फसवणूक; बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.