Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: लातूरमध्ये ‘बंटी-बबली’चे कारनामे! रेल्वे आणि आयकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ३४ बेरोजगारांना गंडा

लातूरमध्ये 'बंटी-बबली' (शरद आणि अंजली जाधव-किनीकर) या जोडीने रेल्वे आणि आयकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ३४ हून अधिक बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 02, 2025 | 07:20 PM
रेल्वे आणि आयकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ३४ बेरोजगारांना गंडा (Photo Credit - X)

रेल्वे आणि आयकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ३४ बेरोजगारांना गंडा (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • नोकरीच्या नावाखाली लाखो रुपये उकळले
  • ‘बनावट नियुक्तीपत्र’ देऊन ट्रेनिंगही दिले
  • शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लातूर, (शहर प्रतिनिधी): लातूर शहरात शरद जाधव-किनीकर आणि त्यांची पत्नी अंजली जाधव-किनीकर या ‘बंटी-बबली’ जोडीने नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरच्या या दाम्पत्याने मुंबई येथील रहिवासी सिद्धांत विजयकुमार बनसोडे आणि साक्षी वाघमारे यांना लक्ष्य केले. त्यांना रेल्वे खात्यात टीसी (TC) आणि आयकर विभागात (Income Tax) अधिकारी म्हणून नोकरी लावतो, असे खोटे आश्वासन देऊन २०२४ मध्ये विविध खात्यांवरून लाखो रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद आहे.

२८ लाख रुपयांची फसवणूक

डिसेंबर २०२३ मध्ये फिर्यादीचे आजोबा चंद्रकांत बनसोडे यांनी लातूर येथील रामलिंग स्वामी यांच्या सांगण्यावरून फिर्यादींना शरद जाधव यांच्या घरी नेले. शरद जाधव यांनी आपली मंत्रालयात आणि दिल्लीत ओळख असल्याचे सांगितले. शरद जाधव आणि त्यांच्या पत्नीने सिद्धांत बनसोडे यांना रेल्वे विभागात टीसी (TC) ची नोकरी तर साक्षी वाघमारे यांना आयकर विभागात अधिकारी म्हणून नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. सिद्धांत बनसोडे यांच्या नोकरीसाठी १२ लाख रुपये, तर साक्षी वाघमारे यांच्या नोकरीसाठी २२ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानुसार, शरद जाधव-किनीकर यांना सुरुवातीला दोन लाख रुपये रोख देण्यात आले आणि ‘ऑर्डर’ आल्यावर उर्वरित दहा लाख रुपये देण्याचे ठरले. २८ लाख रुपये गमावल्याची तक्रार सिद्धांत बनसोडे यांनी पोलिसांत दिली आहे.

Akola Crime: पोलिसांची धडक कारवाई; चार देशी दारू अड्ड्यांवर धाडी, ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!

बनावट नियुक्तीपत्र आणि ट्रेनिंग

आरोपींनी फसवणूक करण्याचा आणखी एक धक्कादायक मार्ग अवलंबला. त्यांनी बनसोडे यांना १५ दिवसांत ऑर्डर मिळेल असे आश्वासन दिले. काही दिवसांनी फिर्यादींना पोस्टाने रेल्वे विभागात टीसीचे बनावट नियुक्तीपत्र प्राप्त झाले. या नियुक्तीपत्रावर १७ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सीएसटी मुंबई येथे हजर होण्याचे आदेश होते. यानंतर आरोपींनी पीडित तरुणांना तीन महिन्यांचे ट्रेनिंगसुद्धा दिले.

फसवणूक लक्षात येताच धमकी

सुरुवातीला कागदपत्र स्कॅनिंगचे काम देण्यात आले. १७ फेब्रुवारी २०२४ ते १६ एप्रिल २०२४ पर्यंत हे काम चालले. दरम्यान, काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने बनसोडे यांनी शरद किनीकर यांना वारंवार विचारणा केली. त्यावेळी शरद किनीकर यांनी उडवाउडवीची उत्तरे देणे चालू केले. ऑगस्ट २०२४ मध्ये फिर्यादीचे आजोबा जेव्हा पुन्हा शरद किनीकर यांना भेटले आणि नोकरी नको, आमचे पैसे परत करा, अशी मागणी केली, तेव्हा “मी तुमच्यावर कारवाई करेन” अशी धमकी देत आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.

या दाम्पत्याने ३ ते ४० मुलांचे काम रखडल्याचे सांगितल्याने, ३४ हून अधिक बेरोजगार तरुण या जाळ्यात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सिद्धांत विजयकुमार बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शरद जाधव-किनीकर आणि अंजली जाधव-किनीकर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० सह इतर कलमांन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीएसआय सुधाकर चव्हाण अधिक तपास करत आहेत.

Gujrat Crime: गुजरात हादरलं! १५ वर्षीय मुलानं भावाचा खून करून गरोदर वहिनीवर केला अत्याचार; आईसह मिळून मृतदेह गाडले

Web Title: 34 unemployed people duped by giving fake appointment letters from railways and income tax department in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 07:15 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Latur News : लातूरमध्ये अवकाळी पावसाचा कहर; सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान
1

Latur News : लातूरमध्ये अवकाळी पावसाचा कहर; सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.