नेमकं काय घडलं?
बिहारमधील रहिवासी असलेले हे कुटुंब काही काळापासून गुजरातच्या जूनागढपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात राहत होते. मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी तिच्याशी संपर्क होत नसल्याने संशय व्यक्त केला आणि त्यांनी विसावदर पोलिसांकडे संपर्क साधला. तेव्हा या भयानक गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
का केली हत्या?
पोलिसांच्या तपासानुसार आरोपी मुलगा स्थानिक डेअरीमध्ये काम करत होता. त्याला आपल्या मोठ्या भावाचा खूप राग येत होता. त्यामागचं कारण असं की त्याचा भाऊ त्याला नेहमी मारहाण करत होते. त्याच्या कमाईचे पैसे घेत असे. या रागातून त्याने लोखंडी रॉडने भावाच्या डोक्यावर जोरदार वार केले. वार इतके जबरदस्त होते की भावाचा जागीच मृत्यू झाला आहे. वाहिनीने हा सगळा प्रसंग स्वतःच्या डोळ्यांसमोर पहिला आणि ती थरथर कापू लागली. तिनं आपला जीव वाचवण्यासाची विनंती केली तर तिच्यासमोर आरोपीने अट टाकली.
वाहिनीवर अट ठेवून जबरदस्ती
वाहिनीसमोर अट टाकली की त्याच्याशी संबंध ठेवले तरच तिचा जीव वाचेल. भयभीत अवस्थेत असलेल्या सहा महिन्यांच्या गर्भवती वाहिनीवर त्याने जबरदस्ती केली. पण आरोपीने अट ठेवली की ती त्याच्याशी संबंध ठेवले तरच तिचा जीव वाचेल. भयभीत अवस्थेत असलेल्या सहा महिन्यांच्या गर्भवती वाहिनीवर त्याने जबरदस्ती केली. नंतर आरोपीला भीती वाटली की ती हा सत्य बाहेर सांगेल, म्हणून तिचाही जीव घेतला. त्याने तिच्या पोटावर गुढघ्याने वार केले आणि गळा आवळून ठार मारलं आहे.
गुन्हा लपवण्यासाठी आरोपी मुलगा आणि त्याची आई या दोघांनी मिळून मृतदेह घराजवळच पाच फूट खोल गाडून ठेवले आणि कपडे जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जेव्हा मृतदेह बाहेर काढले तेव्हा पुरुषाचं डोकं चिरडलेल्या अवस्थेत होतं आणि महिलेला गळा आवळून मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले
मृत महिलेच्या माहेरच्यांनी जेव्हा सासूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने सांगितले की दोघांचा अपघात मृत्यू झाला आहे. पण जेव्हा त्यांनी अपघाताचे फोटो मागितले, तेव्हा सासूने टाळाटाळ केली. संशय वाढल्याने बिहारमधील खगडियाहून महिलेचे नातेवाईक गुजरातला पोहोचले आणि पोलिसांकडे तक्रार दिली. तपासानंतर पोलिसांनी मुलगा आणि आईला ताब्यात घेतलं. चौकशीत मुलाने भावाचा खून आणि वाहिनीवरील अत्याचाराची कबुली दिली आहे. सध्या पोलिसांनी आरोपींच्या विरोधात हत्या, पुरावे नष्ट करणे आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत.
Pimpri Chinchvad: प्रेमविवादातून 18 वर्षीय प्रेयसीवर चॉपर हल्ला; विवाहित तरुणाला आला प्रेयसीवर संशय






