39 people cheated by charging fees in the name of loan approval
पुणे : महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली 39 लोकांकडून शुल्क म्हणून 15 लाख 78 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणूक केलेला शोधन भावे हा मुंबईत असल्याचे समजल्यावर या कर्ज मंजूरीसाठी पैसे दिलेल्या लोकांनी त्याला पकडून येरवडा पोलिसांकडे आणले. पोलिसांनी भावाचे अपहरण करुन मारहाण केल्याचा गुन्हा या लोकांवर दाखल केला.
या प्रकरणामध्ये फसवणूक केल्याबद्दल शोधन भावेसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लवीना अमोदन मरियन (वय ४७, रा. आदर्शनगर सोसायटी, कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी आशा चौधरी, वैष्णवी कुलकर्णी-पाठक, अनुप सुभेदार, शोधन भावे व राजेश कानभास्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सम्राट अशोक सेना नावाची संस्था या महाराष्ट्र बेरोजगार परिषदेचे कार्यालयात नोव्हेबर २०२४ ते १ एप्रिल २०२५ दरम्यान घडला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलिसांच्या माहितीनुसार, शोधन भावे व इतरांनी संगनमत करुन महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. त्यांचे कर्ज फाईल करण्याचे शुल्क म्हणून पैसे घेतले. परंतु, त्यांनी कर्ज मंजूर करुन न देता लोकांची फसवणूक केली. तक्रारदार आणि अन्य 39 लोकांकडून यांनी 15 लाख 78 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन महिलांना अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नंदकुमार केकाण करीत आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरामध्ये चोरी, ड्रग्जमाफिया अशा अनेक घटना समोर येत आहेत. शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबेगाव, विश्रांतवाडी, बाणेर तसेच समर्थ परिसरात बंद फ्लॅट फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील एकाच इमारतीतील तीन फ्लॅट फोडण्यात आले आहेत. साईदत्त निवास टेल्को कॉलनीत एका सोसायटीमधील तीन घरांची घरफोडी करण्यात आली आहे. यामध्ये एका कुटुंबियांचे 65 हजार रुपयांची रोकड आणि एक लाख 61 हजार रुपये किमतींचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. तर परदेशी गेलेल्या एका व्यक्तीचे घर देखील फोडले होते. विश्रांतवाडी येथील मोर्य गार्डनजवळील यशश्री अपार्टमेंटमध्येही घरफोडी झाली. येथून चांदीचे दागिने व रोकड असा 57 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. नाना पेठेतील चंदन सुपर मार्केट हे दुकान देखील फोडण्यात आले. यामध्ये व्यावसायिकाच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे.