बायकोसमोरच भाऊजींनी मेहुणीवर केला बलात्कार! वर्षभरात घरीच मुलाला जन्म; संतापजनक घटनेचा थरकाप उडवणारा शेवट (फोटो सौजन्य-X)
Mumbai Crime News In Marathi : मुंबई़त नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली. मोठ्या बहीणच्या नवऱ्यानेच मेहुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुंबईत एका ४० वर्षीय आरोपीने मेहुणीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. शनिवारी पोलिसांनी आरोपीच्या पत्नीलाही अटक केली. पत्नीवर पतीचा गुन्हा लपवण्याचा आणि घरी बहिणीची प्रसूती केल्याचा आरोप आहे. मुलीला रुग्णालयात दाखल करावे लागल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुलगी आणि दोन्ही आरोपी एकाच घरात राहतात. पीडितेने पोलिसांना सांगितले की तिच्या भाऊजीने मार्च २०२४ ते या वर्षी जुलैपर्यंत अनेक वेळा बलात्कार केला. गर्भवती झाल्यानंतर पीडितेने तिच्या मोठ्या बहिणीकडे याबद्दल तक्रार केली तेव्हा तिने गप्प राहण्याची धमकी दिली. मोठ्या बहिणीने तिच्या पतीचे दुष्कृत्य लपवण्यासाठी कधीही मुलीला वैद्यकीय तपासणी किंवा उपचारांसाठी बाहेर जाऊ दिले नाही. तिने स्वतः घरीच मुलीची प्रसूती केली. परंतु जेव्हा मुलीची प्रकृती बिघडू लागली तेव्हा तिला भाभा रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांना रुग्णालयातून या घटनेची माहिती मिळाली. यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी आणि तिचे मूल दोघांची ही प्रकृती स्थिर आहेत. पोक्सो कायदा आणि बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडितेच्या मोठ्या बहिणीवर गुन्ह्याची माहिती लपविण्याचा, पुरावे नष्ट करण्याचा आणि पीडितेला धमकावण्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.
तर दुसरीकडे मुंबईतून आणखी एक गुन्हेगारी संदर्भातून बातमी समोर येत आहे. बेकायदेशीर ई-सिगारेट व्यापारावर मोठी कारवाई करताना, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने कुर्ला पश्चिम येथील दोन गोदामांवर छापे टाकले. या छापेमारीत २५.५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे बंदी घातलेले परदेशी बनावटीचे ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी ओबैद सलीम शेख नावाच्या ३१ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
युनिट ६ चे वरिष्ठ निरीक्षक भरत घोणे यांनी दिलेल्या माहितीवरून कारवाई करत, गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री कुर्ला पश्चिम येथील मकडावाला कंपाउंडमधील आशाबाई चाळ (खोली क्रमांक १२) आणि विठ्ठलबाई चाळ (खोली क्रमांक २४) या दोन ठिकाणी छापे टाकले. पथकाला बेकायदेशीर विक्रीसाठी बनवलेल्या ई-सिगारेटचा मोठा साठा आढळला. जप्त केलेल्या वस्तूंमध्ये सुमारे २४.६५ लाख रुपये किमतीच्या १२ वेगवेगळ्या ब्रँडच्या विविध फ्लेवर्सच्या १,८८४ ई-सिगारेट, ४०,०४५ रुपये किमतीच्या विविध हुक्का तंबाखू फ्लेवर्स, ४,४०० रुपये किमतीची रोख रक्कम आणि ४०,००० रुपये किमतीचा एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे, ज्यामुळे जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत २५.५० लाख रुपये झाली आहे.