पुण्यातील खेड तालुक्यात खरपुडी गावात २८ वर्षीय तरुणाला आधी मारहाण केली जाते, मग अपहरण केलं जात त्यांनतर धक्कादायक कारण समोर येत ते म्हणजे आंतर जातीय प्रेम विवाह केल्यानं त्याचा राग मनात धरून मुलीच्या भावासह इतरांनी मारहाण करत २८ वर्षीय तरुणाचं अपहरण केलं. या प्रकरणाविरोधात खेड पोलीस ठाण्यात मुलीचा भाऊ आईसह इतर १५ जणांवर मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. २८ वर्षीय तरुण आणि मुलीचा काही दिवसापूर्वी प्रेम विवाह झालेला होता. मात्र हा विवाह आंतरजातीय असल्याने या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता अशी माहिती आहे.
चोरटे जोमात तर पोलिस कोमातच! सहा महिन्यात पुण्यातून 989 वाहने गेली चोरीला
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार १५ जनांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावीया दोघांनाही घरच्यांकडूनच मारहाण करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुळशी भागात पैश्यांसाठी सुनेला तगादा लावल्याने हगवणे कुटुंबात वैष्णवी हगवणे या सुनेचा छळ करून तिला मारहाण करण्यात आली होती. सासरच्यांनी दिलेल्या त्रासामुळे वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली. एकीकडे हे प्रकरण ताज असतानाच मुलीला आणि जावयाला माहेरच्यांकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कदायक घटना ही खेड तालुक्यात घडली आहे. एकीकडे सैराट चित्रपटामधून सामाजिक विषमतेचा चित्र मांडलेलं असतानाच दुसरीकडे मात्र प्रत्यक्षात अश्या घटना घडत आहेत. खेड तालुक्यातील खरपुडी गावची घटना अशीच आहे. या प्रकरणात आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते ,किंवा पोलीस तपासात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
समाजात आपण पाहतो की खंडणी दिली नाही म्हणून अपहरणाच्या घटना या परिचित आहेत मात्र प्रेम विवाह केल्याने घरच्यांनी अपहरण केल्याचं या घटनेची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात होतांना पाहायला मिळत आहे. या कुटुंबावर कारवाई करण्याची ही सध्या समाज माध्यमातून होतांना पाहायला मिळत आहे. अजूनही ग्रामीण भागात प्रेम विवाह या संकल्पनेला अनेकांचा विरोध पाहायला मिळतो त्याचंच हे वास्तव दाखवणारी घटना खरपुडी गावात घडली आहे.
कसं झालं अपहरण?
विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांचं सुखाचं संसार सुरु होता. काही दिवसांपूर्वी या दोघांनी संमतीने प्रेम विवाह केला होता. मात्र या त्यांच्या सुखी संसाराला घरच्यांची नजर लागली. मुलीचा भाऊ आणि आईसह इतर १५ जणांनी मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. आधी मारहाण केलं, मग केलं अपहरण. आता खेड पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास केला जात आहे. नक्की अपहरणाचा कारण काय किंवा मारहाणीचा कारण पोलीस तपासात सखोलपणे बाहेर येईल. मात्र या घटनेने खेड तालुक्यात खळबळ माजली आहे.
तू आम्हाला घाबरत नाहीस का? थांब, तुझा मर्डर करतो; पुण्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला