महाराष्ट्र हादरला! गुंगीचे औषध देऊन मुलीवर केला अत्याचार; मूल जन्माला येताच उपसरपंचाने थेट...
नांदेड: राज्यात महिलांवर अत्याचारच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना नांदेडमध्ये घडली आहे. ५५ वर्षांच्या उपसरपंचाने १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ५५ वर्षांच्या नराधमाने १६ वर्षांच्या मुलीस गुंगीच्या गोळ्या खायला देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. दरम्यान यामध्ये ती पीडिता गर्भवती राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. मात्र हे प्रकरण दाबण्यासाठी बाळ विकले असल्याचा संशय निर्माण होत आहे.
या प्रकरणी नांदेडच्या तामसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी उपसरपंच असल्याचे म्हटले जात आहे. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
बापानेच पोटच्या मुलीवर केला अत्याचार
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बापानेच आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा सातत्याने चर्चेत आहे. वाल्मीक कराड, धनंजय मुंडे यांची नावे देखील या प्रकरणात चर्चेत आहेत. दरम्यान आता ही आत्याचाराची घटना समोर आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्यानेच आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुण त्याला अटक देखील केली आहे. वारंवार आशा घटना राज्यात घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
बीड हादरलं! बायको घरी नसल्याचा फायदा घेत बापानेच पोटच्या मुलीवर…; पोलिसांकडून आरोपीला बेड्या
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदाराने १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी स्थानिकांनी त्याला पकडून मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. बोपखेले येथे रविवारी (दि. १३ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. लाला मोहम्मद शेख (६५, रा. रामनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या सेवानिवृत्त सुभेदाराचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने याप्रकरणी सोमवारी (दि. १४ एप्रिल) दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार असून तो बोपखेले येथे भाडेतत्वावर राहण्यास आहे. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या ठिकाणी राहतात.