
पाच वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर फरार आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
ही कारवाई पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक वैभव मगदूम, पोलिस अंमलदार प्रवीण राजपूत, सुभाष आव्हाड, नितीन साबळे, जहांगीर पठाण, अमजद शेख, दत्तात्रय गेंगजे, रोहिणी पांढरकर, अनिकेत भोसले आणि वैभव रणपिसे यांनी केली आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पथक २० ऑक्टोबरला खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी विश्रांतवाडी चौक, पुणे-आळंदी रोड परिसरात पाच वर्षांपासून पसार झालेला आरोपी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार नितीन साबळे यांना मिळाली.
कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले
गुन्ह्यातील आरोपी संग्रामसिंग भादा दिघी परिसरातील शिवनगरी कॉलनीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी आरोपीचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. संग्रामसिंग भादा हा येरवडा पोलीस ठाण्यातंर्गत दाखल खूनाच्या प्रयत्नातील आरोपी आहे. तो गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच २०२२ पासून पसार झाला होता. कारवाईसाठी त्याला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून
अनैतिक संबंधाच्या संशयातून पीकअप गाडी अंगावर घालून आणि त्यानंतर दगडाने ठेचून एका तरुणाचा निघृण खून केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील सरकोली परिसरात घडली आहे. विष्णू ज्ञानेश्वर जाधव असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी कैलास रामा बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Ans: संग्रामसिंग गजलसिंग भादा (वय ३५, रा. दिघी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
Ans: आरोपी खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Ans: पुणे गुन्हे शाखेच्या युनिट चारने विश्रांतवाडी चौक, पुणे-आळंदी रोड परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली.