बापाने पोटच्या मुलीवर केला अत्याचार (फोटो- istockphoto)
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बापानेच आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा सातत्याने चर्चेत आहे. वाल्मीक कराड, धनंजय मुंडे यांची नावे देखील या प्रकरणात चर्चेत आहेत. दरम्यान आता ही आत्याचाराची घटना समोर आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्यानेच आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुण त्याला अटक देखील केली आहे. वारंवार आशा घटना राज्यात घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे एका गावात एक कुटुंब राहते. या कुटुंबात नवरा-बायकोमध्ये काही कारणाने वाद झाले होते. या वादामुळे त्याची पत्नी पुण्याला निघून गेली होती असे समजते आहे. त्यानंतर घरी केवळ वडील आणि मुलगीच होते. याच संधीचा फायदा घेत पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलीची आई पुन्हा परत घरी आल्यावर सदर प्रकार उघडकीस आला आहे.
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदाराने १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी स्थानिकांनी त्याला पकडून मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. बोपखेले येथे रविवारी (दि. १३ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. लाला मोहम्मद शेख (६५, रा. रामनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या सेवानिवृत्त सुभेदाराचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने याप्रकरणी सोमवारी (दि. १४ एप्रिल) दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार असून तो बोपखेले येथे भाडेतत्वावर राहण्यास आहे. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या ठिकाणी राहतात.
Crime News: सेवानिवृत्त सुभेदाराकडून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
दरम्यान, शेख हा त्याच्या खोलीत पीडीत १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळाली. त्यांनी शेख याला पकडून मारहाण केली. तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत जखमी झाल्याने शेख याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
ट्रिपल सीट जाताना पाय लागला अन् दोन गट भिडले
चिखली मधील साने चौकात दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (१३ एप्रिल) रात्री साडेनऊ वाजता साने चौक, चिखली येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.