
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील घटना
55 वर्षांच्या व्यक्तीचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पोलिसांनी केली आरोपीला अटक
नाशिक जिल्ह्यातील मालेगांव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीच मालेगाव तालुक्यात एका चिमूरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतानाच मालेगावमध्ये संतापजनक घटना घडली आहे. 55 वर्षांच्या व्यक्तीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये एका 55 वर्षांच्या नराधमाने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले. आरोपीला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली असल्याचे समजते आहे.
मालेगावमध्ये एका 13 वर्षांच्या मतिमंद अल्पवयीन मुलीवर 55 वर्षांच्या व्यक्तीने अत्याचार केला आहे. लहान मुलीला फूस देत आपल्या गाडीवर बसवून एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या गुन्ह्याप्रकरणी आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने त्याला पोलिस ओथडी सुनावली आहे.
मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक
मालेगावमध्ये तीन वर्षाच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना संतापजनक व अत्यंत गंभीर आहे. या घटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिला-मुलींची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच दिसते. राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भिती राहिलेली नसूनमहिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. मालेगाव प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, आका, खोक्या यांचा नंगानाच सुरु आहे. सत्ताधारी पक्षाच्या आशिर्वादाने गुंड खुलेआम फिरत आहेत. मागील काही महिन्यातील घटना पाहता सरकारच्या आशिर्वादाने गुंडगिरी फोफावल्याचे दिसते. माफिया, गुंड, भ्रष्ट लोकांना सत्ताधारी पक्षात प्रवेश देऊन पवित्र करून घेतले जात आहे. सरकारच गुन्हेगारांना राजाश्रय देत असेल तर गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढणारच पण सरकारला त्याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही. पोलीस केवळ विरोधीपक्षांच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी, विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावण्यासाठी, विरोधकांचे फोन टॅप करण्यासाठी ठेवलेले आहेत.