Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दाभरूळ फाट्यावर भीषण अपघात, खाजगी बसची ट्रकला धडक; जखमींचा आकडाही समोर

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरूळ फाट्याजवळ ट्रॅव्हल्सने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. रविवारी (दि. २३) सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात ट्रॅव्हल्समधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 24, 2026 | 01:12 PM
दाभरूळ फाट्यावर भीषण अपघात, खाजगी बसची ट्रकला धडक; जखमींचा आकडाही समोर

दाभरूळ फाट्यावर भीषण अपघात, खाजगी बसची ट्रकला धडक; जखमींचा आकडाही समोर

Follow Us
Follow Us:

पाचोड :  राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज अनेकांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दाभरूळ फाट्याजवळ ट्रॅव्हल्सने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. रविवारी (दि. २३) सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात ट्रॅव्हल्समधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

ट्रक (क्र. आरजे ०२ जीसी ३५९५) छत्रपती संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने ट्रॅव्हल्स (क्र. एआर ११ एल ९०२१) प्रवाशांना घेऊन जात होती. दाभरूळ फाट्याजवळ येताच ट्रॅव्हल्स चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स ट्रकच्या मागील भागावर जोरात आदळली. धडक एवढी जोरदार होती की, ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना मोठा धक्का बसला. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळ उडाला. जखमींचा आक्रोश ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना वाहनातून बाहेर काढले.

सुभाष ढवळे, सिद्धू हिरवे, मेघराज मस्के आणि देवराव जाधव यांच्यासह अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक

सिहोर येथील कुबेरेश्वर धामच्या दर्शनासाठी जात असलेल्या नागपूरमधील भाविकांच्या कारला मुलताईजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या मागील भागावर आदळल्याने नागपूरच्या तिघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले. शनिवारी पहाटे बैतूल-नागपूर महामार्गावर हा अपघात घडला. मृतांमध्ये बुटीबोरी येथील दीपक श्यामराव राऊत (वय ५५), पत्नी छाया दीपक राऊत (वय ५१) आणि प्रभा रामकृष्ण करदाते (वय ४८) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये नीता (वय ४०), नैतिक (वय १२), उज्ज्वला मोहन (वय ५२), संगीता (वय ४३) आणि सौरभ (वय ३०) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: 8 people have been injured in a severe accident involving a bus and a truck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Accident News
  • Bus Accident
  • Hospital

संबंधित बातम्या

जगभरातील 2,400 संशोधनांमध्ये डॉ. प्रांजल काशिव अव्वल; सिडनीत मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान
1

जगभरातील 2,400 संशोधनांमध्ये डॉ. प्रांजल काशिव अव्वल; सिडनीत मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान

घाटातील त्या वळणावर अचानक बस पलटी; गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू
2

घाटातील त्या वळणावर अचानक बस पलटी; गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
3

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
4

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.