Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Road Accident News : रविवार ठरला मृत्यूचा काळ! विविध राज्यात झाले सहा भीषण अपघात, २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

देशातील उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, हरियाणा आणि राजस्थानमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातांत २५ जणांचा मृत्यू झाला. अतिवेग, चालकांचा थकवा, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि खराब रस्त्यांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 22, 2026 | 03:17 PM
road-accidents-india-25-killed-up-bihar-gujarat-rajasthan-haryana

road-accidents-india-25-killed-up-bihar-gujarat-rajasthan-haryana

Follow Us
Follow Us:
  • देशभरातील भीषण अपघातांत २५ जणांचा मृत्यू
  • रस्ते सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
  • वेग, चालकांचा थकवा आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष
Road Accident News : नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांत गेल्या आठवड्याच्या अखेरीस झालेल्या भीषण रस्ते अपघातांमध्ये तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थान, गुजरात, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या दुर्घटनांमध्ये महिला, मुले आणि तरुणांचाही समावेश आहे. या अपघातांमुळे पुन्हा एकदा देशातील रस्ते सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे राष्ट्रीय महामार्ग-२ वर डबल डेकर बस आणि ट्रकची धडक झाली. दिल्लीहून वाराणसीकडे जाणाऱ्या बसला झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू, तर १५ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. तसेच कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात मुलांसह एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच बिहारच्या अथमलगोला परिसरात तिलक समारंभातून परतणाऱ्या स्कॉर्पिओला अनियंत्रित हायवाने धडक दिली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पाटणा मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलविण्यात आले.

राजस्थानच्या कोटा येथील अपघातात महाराष्ट्रातील 9 जणांचा मृत्यू; 6 जण जखमी

हरियाणातील करनाल येथे दोन वाहनांची धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. गुजरातमधील कच्छमध्ये भुज-खावडा राष्ट्रीय महामार्गावर कार आणि भरधाव ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि तीन महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. हे कुटुंब रण ऑफ कच्छला भेट देऊन भुजकडे परतत होते.

राजस्थानच्या जोधपूरमध्ये कार आणि ट्रॅव्हल टेम्पोच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू, तर १५ जण जखमी झाले. गुजरातमधील एक कुटुंब रामदेवरा दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.

या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिवेग, चालकांचा थकवा व झोप, रस्त्याच्या कडेला उभी असलेली अवजड वाहने आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन ही प्रमुख कारणे समोर येत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी खराब रस्ते, खड्डे, अपूर्ण बांधकाम, अपुरे रिफ्लेक्टर आणि प्रकाशव्यवस्थेचा अभाव यामुळेही अपघातांचा धोका वाढतो.

Pakistan Minister India Visit : पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री मुसादिक मसूद मलिक भारत दौऱ्यावर; ताजमहल पाहण्याची दिली परवानगी पण…

रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या मार्च २०२६ मधील राज्यसभेतील आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये देशभरात ४ लाख ८७ हजार ७०७ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, त्यात १ लाख ७७ हजार १७५ जणांचा मृत्यू झाला. यातील सुमारे ७० टक्के मृत्यू अतिवेगाशी संबंधित होते. त्यामुळे रस्ते सुरक्षा केवळ नियमांपुरती मर्यादित न ठेवता वेग नियंत्रण, सुरक्षित पार्किंग, नियमित गस्त आणि चालकांसाठी विश्रांतीची व्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: देशभरातील रस्ते अपघातांत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, हरियाणा आणि राजस्थानमध्ये झालेल्या विविध अपघातांत एकूण २५ जणांचा मृत्यू झाला.

  • Que: रस्ते अपघातांची प्रमुख कारणे कोणती आहेत?

    Ans: अतिवेग, चालकांचा थकवा व झोप, वाहतूक नियमांचे उल्लंघन, रस्त्याच्या कडेला उभी असलेली अवजड वाहने आणि खराब रस्ते ही प्रमुख कारणे आहेत.

  • Que: भारतात २०२४ मध्ये किती रस्ते अपघात झाले?

    Ans: रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये देशभरात ४ लाख ८७ हजार ७०७ रस्ते अपघातांची नोंद झाली. या अपघातांत १ लाख ७७ हजार १७५ जणांचा मृत्यू झाला.

Web Title: Road accidents india 25 killed up bihar gujarat rajasthan haryana nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident News
  • Road Accident

संबंधित बातम्या

राजस्थानच्या कोटा येथील अपघातात महाराष्ट्रातील 9 जणांचा मृत्यू; 6 जण जखमी
1

राजस्थानच्या कोटा येथील अपघातात महाराष्ट्रातील 9 जणांचा मृत्यू; 6 जण जखमी

Ambulance Accident: रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता अन्…चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक!
2

Ambulance Accident: रुग्णवाहिकेत एकही रुग्ण नव्हता अन्…चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई-वडिलांची प्रकृती चिंताजनक!

Kokankada Death: “कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय…” शेवटचा फोन कॉल अन् खोल दरीत सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह!
3

Kokankada Death: “कोणीतरी मला ब्लॅकमेल करतंय…” शेवटचा फोन कॉल अन् खोल दरीत सापडला २० वर्षीय तरुणाचा मृतदेह!

Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..
4

Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.