खळबळजनक ! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत चुंबन घेतलं अन्...
नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये एका खाजगी आयटी कंपनीत काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणीमुळे तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव नंदिनी असं आहे. ती मूळची उत्तर प्रदेशमधील कानपूरची रहिवासी होती. ही घटना ऐरोली सेक्टर १ येथील ओंकार हाईट्स सोसायटीमध्ये घडली. नंदिनी ही येथे एका पेइंग गेस्ट रूममध्ये राहत होती.
Nagpur Murders : उपराजधानी नागपुरात चाललंय तरी काय? अवघ्या २४ तासात ३ हत्या; शहरात खळबळ
नेमकं काय घडलं?
नंदिनीच्या घरातून कोणताही आवाज न आल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिल्यानंतर तिचा मृतदेह फॅनला लटकलेला आढळून आला. घटनेची माहिती रबाळे पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी घटनास्थळी तपास करतांना नंदिनीच्या खोलीतून एक चिठ्ठीही जप्त केली. या चिठ्ठीत तिने आर्थिक अडचणी आणि घरून येणार मानसिक तणाव यामुळेच हे टोकाचं पाऊल उचलल्याचा उल्लेख केला आहे. अशी माहिती राबळे पोलिसांनी दिली आहे.
नंदिनी एका खाजगी आयटी कंपनीमध्ये कार्यरत होती. तिच्यासोबत आणखी तीन तरुणीही राहत होत्या, मात्र सुट्ट्यांमुळे त्या आपापल्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी नंदिनी एकटीच घरात होती. गेल्या काही महिन्यांपासून ती सतत नैराश्यात होती अशी माहिती तिच्या रूममेट्सनी दिली आहे. रबाळे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दौंड-पुणे डेमू ट्रेनमध्ये टॉयलेटला आग
दौंडहून पुण्याकडे जाणाऱ्या डेमू (DEMU) ट्रेनमध्ये सोमवारी (१६ जून) सकाळी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ७:०५ वाजता दौंड स्टेशनहून निघालेल्या या शटल ट्रेनच्या एका डब्यातील शौचालयाला अचानक आग लागली.या आगीमुळे काही काळ प्रवाशांमध्ये घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.