Kolhapur News : शिरोळ तालुक्यातील चिपरीत 22 वर्षांच्या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करत खून; बहिणीला गाडीवरून सोडलं अन्...
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील चिपरी गावात 22 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि.6) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. संदेश लक्ष्मण शेळके (वय २२, रा. माळ भाग, अहिल्यानगर, चिपरी) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, यातील संदेश शेळके हा आपल्या ओला दुचाकीवरुन सकाळी साडेआठच्या सुमारास तारांगण हॉटेल समोरील बस स्टॉपवर बहीणीला सोडून परत घरी जात होता. त्यावेळी मध्येच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पाठलाग केला. त्यावेळी घाबरलेल्या अवस्थेत संदेश शेळके याने जवळील ओला दुचाकी घोडावत यांच्या पार्किंग संरक्षण भिंती लगत असणाऱ्या राजू सूर्यवंशी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गट नंबर ४३४ जवळ नेली. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने संदेश शेळके याच्या मानेवर, अंगावर वर्मी सहा घाव केल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : Palghar Shocking Video : मालकीणीला जाब विचारायला गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर मालकिणीने घातली कार; पालघरमधील धक्कदायक प्रकार
या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती समजताच घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला. यावेळी जयसिंगपूर उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळुंके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास यंत्रणा गतिमान करून संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांना सांगितले आहे.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम होते सुरू
दरम्यान, संदेश शेळके याच्या खून प्रकरणावरून गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा मोठा फौजपाटा चिपरी व जयसिंगपूरमध्ये तैनात करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Nagpur crime: आजारपण आणि एकटेपणाला कंटाळून वयोवृद्ध जोडप्यांनी उचलले टोकाचे पाऊल; एकाचा मृत्यू तर एकावर उपचार सुरु
खेड तालुक्यातही खूनप्रकरण
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातील खेड तालुक्यात आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या तरूणीला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आंतरजातीय विवाहाच्या रागातून दाम्पत्यावर हल्ला करत पत्नीच्या कुटुंबियांनी पत्नीचे अपहरण केले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर खेड पोलीस ठाण्यात एकूण १५ जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.