नागपूर: नागपूरमधून एक हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. आजारपण, वृद्धावस्था आणि एकटेपणाला कंटाळून एका वृद्ध दाम्पत्याने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचं प्रयत्न केला. या घटनेत ८० वर्षीय गंगाधर हरणे यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी निर्मला हरणे (70 वर्ष) या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. ही घटना नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समर्थनगर परिसरात बुधवारी घडली.
Uttarpradesh crime: रुग्णवाहिकेचा गेट उघडला आणि मृतदेह रस्त्यावर फेकला, नेमकं काय घडलं?
गंगाधर हरणे आणि निर्मला हरणे यांचा मुलगा नोकरीसाठी नागपूरच्या बाहेर राहतो. तर मुलीचा विवाह झाल्यानंतर सासरी राहते. त्यामुळे नागपुरातील घरात हरणे दांपत्य एकटेच राहत होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवले. सुसाईड नोटमध्ये वृद्धावस्था, आजारपण आणि एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हरणे दाम्पत्याचा मुलगा भिलाई येथे नोकरी निमित्त राहतो. मुलीचं लग्न झाल्याने ती सासरी राहते. त्यांच्याकडे बघायला कोणी नाही आहे. स्वतःचे घर, खर्च करायला पुरेसा पैसा असला तरी आजारपण आणि एकाकी जीवन त्यांना छळत होते आणि त्यातून त्यांनी असा दुर्दैवी मार्ग काढला. त्यांनी आधी घराला कुलूप लावला आणि बाहेर अंगणात बसून टॅफगोर नावाचं किटकनाशकचे द्रव्य दोन पेल्यात घेऊन प्यायले. त्यानंतर थोड्याच वेळात ते अंगणात तडफडत असल्याचे आणि त्यांच्या तोंडाला फेस आल्याचे शेजाऱ्यांना दिसले. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी जर वेळीच पोलिसांना कळवले असते तर कदाचित गंगाधर हरणे यांचा जीव वाचला असता असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
भीषण अपघात! रस्त्यावर व्यायाम करतांना भरधाव ट्रकनं ६ मुलांना चिरडले, चार जण जखमी
गडचिरोलीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रॅकने ६ मुलांना चिरडले असून ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उर्वरित दोघांचा नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. गडचिरोली- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील काटली येथे हा भीषण अपघात झाला आहे. हे ६ मुलं रस्त्यावर व्यायाम करत होते त्यावेळी अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की चार मुलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर काटली गावात शोककळा पसरली आहे. संतप्त गावकऱ्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.