
२७ वर्षीय गर्भवती महिलेची आत्महत्या
वाळूजमहानगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे पतीसह राहणाऱ्या २७ वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.१३) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त करत फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.
पल्लवी मदन जगताप (वय २७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पल्लवी या वडगाव कोल्हाटी (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे पतीसह राहत होत्या. १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरी वडगाव कोल्हाटी येथे सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यात ती बेशुद्ध झाली. रावसाहेब घोपटे व कृष्णलाल शंकर ठोंबरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या घाटीत येथे दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून साडेदहा वाजता घोषित केले.
हेदेखील वाचा : Nagpur Crime: दारूच्या नशेत शेजाऱ्याचा हैवानपणा! किरकोळ वादातून माय-लेकीची लाकडी दांड्याने निर्घृण हत्या
याप्रकरणी घाटी दावाखाना येथून पोलिस अंमलदार एम. डी. सोनवणे यांनी दिलेली माहितीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार टी. के शिंदे करत आहे.
पल्लवी होती सहा महिन्याची गर्भवती
पल्लवी ही सहा महिन्यांची गर्भवती होती. पतीसह वडगाव कोल्हाटी येथे राहत होती. अशी माहिती पल्लवीच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान तिचे पोस्टमार्टम सुरू असतानाच नातेवाईकांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गर्दी केली होती.
कोर्ट परिसरातच तरुणाची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, साकेत कोर्टात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. हरीश सिंग असे या तरुणाचे नाव आहे, जो साकेत कोर्टात काम करणारा एक लिपिक होता. मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. वृत्तानुसार, कामाच्या ताणामुळे त्या तरुणाने आत्महत्या केली. हरीश सिंगने कोर्ट कॉम्प्लेक्सच्या वरच्या मजल्यावरून उडी मारली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तथापि, त्याने त्याच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. हरीश ६० टक्के अपंग होता. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; सात लाखांसाठी गर्भवती महिलेचा छळ, अखेर गळफास घेऊन आत्महत्या