Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवस साजरा करायला गेली आणि होत्याचं नव्हतं झालं, मोखाडा तालुक्यात 7 वर्षीय बालिकेचा घेतला जीव

पालघरमधील मोखाडा तालुक्यात 7 वर्षीय बालिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 28, 2024 | 04:59 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

मोखाडा/ दीपक मधुकर गायकवाड: सध्या महाराष्ट्रात गुन्हेगारी सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे पोलिसांसमोर ही वाढती गुन्हेगारी थांबवण्याचे मोठे आव्हान आहे. नुकतीच एक घटना पालघरमधील मोखाड्या तालुक्यात घडली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर निघालेल्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना सविस्तर जाणून घेऊया.

मोखाडा नजिक पिंपळाचापाडा येथे रविवारी रात्री शेजारी वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या एका 7 वर्षीय बालिकेला आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेननंतर मोखाडा पोलिस एकूणच घटनाक्रमाचा मागोवा घेत आहेत.

हे देखील वाचा: टाटा मीठाच्या नावाने बनावट मिठाची विक्री; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल

नेमकं घडलं काय?

शेजारी वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असल्याचे सांगून पिंपळाचापाडा येथील 7 वर्षीय बालिका घरातून गेली ती उशीरा पर्यंत घरी आली नाही. त्यामूळे घरातील लोकांनी तीची शोधाशोध सुरू केली असता जवळच असलेल्या मुस्लिम बांधवांच्या दफनभुमी जवळ सदर बालिका पडलेली आढळून आली. तीला लगोलग मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविले असता तिला मृत घोषित करण्यात आले आहे. मात्र मोखाडा पोलिसांनी सदर बालिकेचे शव विच्छेदन करून अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवले असल्याचे समजते. शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वस्तूस्थिती समोर येणार आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलिस उपअधिक्षक गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले व त्यांची संपूर्ण टिम करीत आहे.

हे देखील वाचा: Baba Siddique Case: लॉरेन्स बिश्नोई की दुसरा कुणी? बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधाराचं नाव समोर

सदर बालिकेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा संशय असून ही घटना रविवारी २७ तारखेला मोखाड्यात घडली आहे.या घटनेने मोखाडा तालुका हादरला असून पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पिंपळाचापाडा सह शेजारील गाव पाड्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या मुली तालुक्याच्या शाळेत कशा पाठवायच्या,त्यांच्या सुरक्षिततेचे काय अशी भिती पालकांमधून व्यक्त केली जात आहे.

या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर पकडावे आणि त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता गावामध्ये जोर धरू लागली आहे.

Web Title: A 7 year old girl lost her life in mokhada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 04:58 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Maharashtra News Update
  • palghar

संबंधित बातम्या

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
1

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ
2

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा
3

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince
4

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.