Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजाचा थरकाप! तळेरानमधील पाझर तलावात बुडून जुळ्या बहीण- भावाचा मृत्यू

तळेरान (ता. जुन्नर) येथील पुष्पावती नदीवरील पाझर तलावात बुडून नऊ वर्षांच्या सख्ख्या जुळ्या बहीण-भावाचा अंत झाला आहे. श्रावणी रामदास साबळे आणि गणेश रामदास साबळे (वय११ वर्षे) अशी या मृत चिमुकल्यांची नावे आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2026 | 05:28 PM
काळजाचा थरकाप! तळेरानमधील पाझर तलावात बुडून जुळ्या बहीण- भावाचा मृत्यू

काळजाचा थरकाप! तळेरानमधील पाझर तलावात बुडून जुळ्या बहीण- भावाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

​ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात एक चटका लावून जाणारी घटना घडली आहे. तळेरान (ता. जुन्नर) येथील पुष्पावती नदीवरील पाझर तलावात बुडून नऊ वर्षांच्या सख्ख्या जुळ्या बहीण-भावाचा अंत झाला आहे. श्रावणी रामदास साबळे आणि गणेश रामदास साबळे (वय११ वर्षे) अशी या मृत चिमुकल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

 

​मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणी आणि गणेश हे दोघेही मूळचे तळेरान (वसईवाडी) येथील रहिवासी असून, ते शिक्षणासाठी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे राहत होते. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने ते आपल्या गावी वसईवाडी येथे आले होते. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या मोठ्या बहिणीसोबत हे दोघेही पुष्पावती नदीवरील पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेले होते.

​तलावाच्या काठावर खेळत असताना या दोघांचाही पाय घसरला आणि ते खोल पाण्यात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले. सोबत असलेल्या मोठ्या बहिणीने व इतर मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ​स्थानिक नागरिकांनी मोठ्या शिताफीने दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना ‘मृत’ घोषित केले.

​या घटनेबाबत अधिक माहिती देताना तळेरान गावचे सरपंच गोविंद साबळे यांनी सांगितले की, “दोन्ही भावंडे अतिशय गुणी होती. सुट्टीसाठी गावी आले असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. या घटनेमुळे साबळे कुटुंबावर आभाळ कोसळले असून संपूर्ण गाव शोकाकुल आहे.

​एकाच वेळी घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने वसईवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मुले नदी, नाले किंवा तलावाकाठी खेळायला जातात. पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्यांना एकटे जलाशयाजवळ पाठवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान या कुटुंबात चार मुली आणि एक मुलगा होता.

दरम्यान श्रावणी आणि गणेश यांच्या अकाली जाण्याने परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली असून, या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : भोर-रामबाग मार्गावर एसटी-कारचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू; 4 जण गंभीर जखमी

Web Title: A brother and sister died after drowning in a lake in taleran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 05:28 PM

Topics:  

  • crime news
  • Death
  • maharashtra

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना
3

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय
4

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.