Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून एका तरुणाला बुलेट दुचाकी आणि त्यानंतर ऑटो रिक्षातून निर्जन ठिकाणी नेऊन बेदम मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 24, 2026 | 11:39 AM
मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

Follow Us
Follow Us:
  • मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग
  • तरुणाचा बेदम मारहाण करुन खून
  • वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला छडा
पिंपरी : मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून एका तरुणाला बुलेट दुचाकी आणि त्यानंतर ऑटो रिक्षातून निर्जन ठिकाणी नेऊन बेदम मारहाण करत त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईसमोरील मोकळ्या जागेतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी शनिवारी (दि. १९) रात्री साडेअकरापूर्वी ही घटना घडली आहे. खुनानंतर आरोपी पसार झाले होते. मात्र, वाकड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या चार तासांत गुन्ह्याची उकल करून चौघांना अटक केली आहे.

 

मारुती बाळासाहेब बनसोडे (वय ३७, रा. बौद्धनगर, दत्तनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांचे मामा सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (वय ५४, रा. बोराडेवाडी, डी-मार्टसमोर, मोशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमित दशरथ साळुंखे (वय २६, रा. जगतापनगर, थेरगाव), किशोर सुभाष वाघमारे (वय ३९, रा. पवारनगर, थेरगाव), भारत संजय पवार (वय २३, रा. पवारनगर, थेरगाव) आणि किरण अंकुश उमाप (वय २८, रा. अण्णाभाऊ साठेनगर, वाकड) यांना अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित साळुंखे याच्या मानलेल्या बहिणीची मारुती बनसोडे यांनी छेड काढल्याचा राग त्याच्या मनात होता. या कारणावरून अमितने आपल्या साथीदारांसोबत संगनमत करून बनसोडे याला मारहाण करण्याचा कट रचला. त्यानुसार बनसोडे याला प्रथम बुलेट दुचाकीवरून आणि त्यानंतर ऑटो रिक्षामधून वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडईसमोरील मोकळ्या जागेतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी आणण्यात आले. तेथे आरोपींनी बनसोडे यांच्या डोक्यासह तोंड, गळा, हनुवटी तसेच शरीराच्या इतर भागांवर जबर मारहाण केली. या मारहाणीत बनसोडे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. सुरुवातीला आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यातील संबंध तसेच खुनाचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने पोलिसांसमोर आरोपींची ओळख पटविण्याचे आव्हान होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी तपास पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अमित साळुंखे, किशोर वाघमारे आणि भारत पवार यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी तिघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर फरार साथीदार किरण उमाप याचाही शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भोकरे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा :  ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

‘या’ पथकाने केली खुनाची उकल

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, सहायक पोलीस निरीक्षक भोकरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे, सहायक पोलीस फौजदार दळे, पोलीस हवालदार वंदू गिरे, सचिन गायकवाड, मोहम्मद नदाफ, विजय मोरे, हनुमंत कांबळे, विजय घाडगे, विजय भुसारे, पोलीस शिपाई समाधान कांबळे, कारभारी पालवे, विक्रम भगत, कौतेंय खराडे, ज्ञानदेव झेंडे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे आणि मंगेश लोखंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title: Wakad police have arrested four individuals for murdering a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने  महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?
1

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
2

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
3

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
4

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.