Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त

पिंपरी-चिंचवडसह पुणे शहराच्या विविध भागांत दुचाकी चोरणाऱ्या उच्चशिक्षित सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 24, 2026 | 11:59 AM
उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त

उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह पुणे शहराच्या विविध भागांत दुचाकी चोरणाऱ्या उच्चशिक्षित सराईत चोरट्याला वाकड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीच्या अटकेमुळे वाकड, काळेवाडी, हिंजवडी, भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. महादेव शिवानी गरड (वय २७, रा. नवले हॉस्पिटलजवळ, पुणे; मूळ रा. अंबुलगा, ता. चाकूर, जि. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलिसांनी त्याला १८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मागील तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासह पुणे शहरातील विविध भागांतून अनेक दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. तपास पथकाने यापूर्वी वाकड परिसरात झालेल्या वाहनचोरीच्या घटनास्थळांची पाहणी केली. घटनास्थळ तसेच आजूबाजूच्या परिसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासण्यात आले. त्यासोबत तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला.

दरम्यान, संबंधित आरोपी पुन्हा दुचाकी चोरी करण्यासाठी वाकड परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी योग्य ठिकाणी सापळा रचून महादेव गरड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मागील तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच आजूबाजूच्या परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या एकूण ११ दुचाकी जप्त केल्या. आरोपीच्या अटकेमुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन, काळेवाडी पोलीस ठाण्यातील चार तसेच हिंजवडी, भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एक असे एकूण १० वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दुचाकी चोरीचे गुन्हे करताना आरोपी वेगवेगळ्या परिसरांची निवड करत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याची ओळख पटवून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. पुढील तपास पोलीस हवालदार वंदू गिरे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

यांनी केली कामगिरी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे, सहायक पोलीस फौजदार दळे, पोलीस हवालदार वंदू गिरे, सचिन गायकवाड, मोहम्मद नदाफ, विजय मोरे, विजय घाडगे, दीपक साबळे, विजय भुसारे, पोलीस शिपाई समाधान कांबळे, कारभारी पालवे, विक्रम भगत, कौतेंय खराडे, ज्ञानदेव झेंडे, प्रमोद गायके, अभिषेक मांडे आणि मंगेश लोखंडे यांनी ही कामगिरी केली.

Web Title: The wakad police have taken action by arresting a two wheeler thief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Theft

संबंधित बातम्या

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
1

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने  महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?
2

वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
3

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
4

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.