Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

जमिनीचा विकसन करारात ३७ कोटी ४८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 17, 2026 | 01:26 PM
शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे : जमिनीचा विकसन करारात ३७ कोटी ४८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलिस ठाण्यात नाना भानगिरे, गोयल, पटेल आणि ठकवाणी भागीदारी संस्थेच्या संचालकांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिंक गुन्हे शाखेने आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, महमंदवाडीतील तब्बल ३०० कोटीचे बाजारमूल्य असलेली जमीन आरोपींनी विकसनासाठी घेतली होती. या बदल्यात तक्रारांकडून २२ कोटी रूपये संस्थेच्या खात्यात स्वीकारले. मात्र, करारानुसार आवश्यक असलेले खाते उघडण्यास आणि जमिनीचे निर्वेध मालकी हक्क करून देण्यास टाळाटाळ केली. याउलट त्यांना संबंधित जागेवर प्लॅन सॅक्शन आणि कमेंसमेंट सर्टिफिकेटसाठी १५ कोटी ४८ लाख रूपये खर्च करण्यास भाग पाडले. मागील १४ वर्षापासून ३७ कोटी ४८ लाख रूपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

परस्पर विक्री आणि थर्ड पार्टी इंटरेस्टचा बनाव

तक्रारदारासोबत अधिकृत करार अस्तित्वात असताना यातील आरोपींनी सर्व्हे नं. १८/१/१ मधील १२ गुंठे जमीन परस्पर नाना भानगिरे यांना विकली. विशेष म्हणजे, या व्यवहारासाठी कोणताही मोबदला घेतला गेला नाही. केवळ तक्रारादारांचा हक्क डावलण्यासाठी आणि थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी हा व्यवहार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

याप्रकरणाची पोलिस चौकशी सुरू झाली. हा बेकायदेशीर व्यवहार कायदेशीर दाखविण्यासाठी २८ डिसेंबर २०२५ रोजी आरोपींनी भानगिरे यांच्याकडून ९६ लाख रूपये स्वीकारल्याचे दाखवले. मात्र, मुळ खरेदी खतावेळी कोणताही पैसा दिला नसल्याने हा संपूर्ण प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : डोळ्यात तिखट, चाकूने वार आणि दगडाने ठेच; संतापलेल्या पती-पत्नीने मिळून तरुणाची केली हत्या

पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट

पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढत असून दोन वेगवेगळ्या प्रकरणांत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. कारवाईची भीती दाखवून एका तरुणाकडून ४ लाख ८१ हजार रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. तर शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : प्रेयसीच्या फोनवरुन मेसेज आला, तरुण कोथरुडला भेटायला गेला अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

Web Title: A case has been registered against shiv sena city chief nana bhangire in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
1

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
3

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
4

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.