Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

शाळेतील प्रवेश प्रक्रिया, शिक्षकांचे वेतन, शैक्षणिक सहलींचा खर्च अशा प्रकरणांत आर्थिक गैरव्यवहार करून शैक्षणिक संस्थेची ४ कोटी ९८ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 06, 2026 | 03:14 PM
सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:

पिंपरी : शाळेतील प्रवेश प्रक्रिया, शिक्षकांचे वेतन, शैक्षणिक सहलींचा खर्च अशा प्रकरणांत आर्थिक गैरव्यवहार करून शैक्षणिक संस्थेची ४ कोटी ९८ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल येथे घडला आहे. याप्रकरणी शाळेच्या माजी संचालकाविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अमोल आनंदराव गावंडे (५०, रा. बिल्डिंग एफ-५, फ्लॅट क्र. १८, कॅम्प गार्डन, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माजी संचालकाचे नाव आहे. याप्रकरणी डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या खजिनदार महिला यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल गावंडे हा संस्थेचे संचालक तसेच डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठाचा प्र-कुलगुरू म्हणून कार्यरत होता. संस्थेचा दैनंदिन कारभार, आर्थिक व्यवहार, प्रवेश प्रक्रिया, कर्मचारी वेतन, प्रवेश सल्लागारांची बिले तसेच विविध खर्चांना मंजुरी देण्याचे काम आरोपीच्या नियंत्रणाखाली होते. दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमिततेचा संशय आल्याने संस्थेने ए. झेड. बी. अँड पार्टनर्स या संस्थेमार्फत फॉरेन्सिक ऑडिट केले. १२ जून २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अहवालात जवळपास पाच कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला.

तपासात प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांवरही एजन्सींना कमिशन अदा केल्याचे, तसेच एकाच विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक प्रवेश सल्लागारांशी मॅपिंग करून दुहेरी बिले काढत १ कोटी ८ लाख ५० हजार रुपयांचे अतिरिक्त कमिशन वाटप केल्याचे समोर आले. याशिवाय, बायोमेट्रिक उपस्थिती नसतानाही कर्मचारी आणि प्राध्यापकांची बनावट वेतनपत्रके तयार करून त्यांना पूर्ण वेतन मंजूर करण्यात आले. या प्रकारातून संस्थेच्या निधीतून ३ कोटी २७ लाख ८४ हजार रुपये बेकायदा वितरित करण्यात आल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संस्थेऐवजी वैयक्तिक खात्यात रकमा

संस्थेच्या शैक्षणिक सहलींसाठी नियुक्त ट्रॅव्हल एजन्सीमार्फत प्रत्यक्ष खर्चापेक्षा जास्त रकमेची बिले सादर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप आहे. आरोपीच्या वैयक्तिक आयसीआयसीआय बँक खात्यात संबंधितांकडून ४२ लाख ३५ हजार रुपये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच व्हिजिटिंग फॅकल्टीला ११ लाख ६९ हजार रुपयांचे अतिरिक्त मानधन मंजूर करणे आणि गोवा फ्रेशर्स टूरमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक नोंदवून ३१ लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

हे सुद्धा वाचा : मावळमध्ये मुसळधार पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत; महामार्ग व रेल्वे वाहतूक ठप्प

गोपनीय माहिती कॉपी केली

संस्थेमध्ये अंतर्गत चौकशी सुरू झाल्यानंतर आरोपीने वापरातील अधिकृत लॅपटॉप फॉरमॅट करून त्यातील गोपनीय माहिती स्वतंत्र हार्डडिस्कमध्ये कॉपी केल्याचा आरोप आहे. तसेच, अधिकृत ई-मेलवरील संवेदनशील माहिती स्वतःच्या वैयक्तिक ई-मेलवर पाठवून डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, शनिवार (दि. ४) आरोपीवर चौकशीअंती भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

Web Title: A case has been registered against the former director of d y patil b school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.