Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावकारी पद्धतीने 44 लाखांची फसवणूक, दोघांंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील दोन गाळे कुलमुखत्यापत्राचे अगोदर फसवून खरेदीखत केले. त्यानंतर सावकारी पद्धतीने लाखो रुपयांची रक्कम उकळल्यानंतर दोन गाळे (दुकाने) खरेदीखत करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 27, 2026 | 06:35 PM
सावकारी पद्धतीने 44 लाखांची फसवणूक, दोघांंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सावकारी पद्धतीने 44 लाखांची फसवणूक, दोघांंवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील दोन गाळे कुलमुखत्यापत्राचे अगोदर फसवून खरेदीखत केले. त्यानंतर सावकारी पद्धतीने लाखो रुपयांची रक्कम उकळल्यानंतर दोन गाळे (दुकाने) खरेदीखत करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

 

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात हसमुख पारसमल जैन (वय ४२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, शेखर बापुसाहेब चिंधे (रा. जांभुळवाडी) व अमित देवराम कलाटे (रा. वाकड) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) सह सावकारी अधिनियम कलम ३९,४५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार मार्च २०२३ ते एप्रिल २०२६ या कालावधीत घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांचा सराफी व्यावसाय आहे. तक्रारदार यांचे वडिलोपार्जित माणिकबाग परिसरातील कुदळे पाटील प्रॉपर्टीज येथे शेजारी-शेजारी दोन गाळे होते. दरम्यान, वडिलांच्या आजारपणात त्यांनी हे दोन्ही दुकाने बंद केली होती. नंतर त्यांनी एक दुकान भाड्याने दिले व दुसऱ्या दुकानात कपड्यांचा व्यावसाय सुरू केला होता. नंतर पुन्हा त्यांनी २०२२ मध्ये सराफी दुकान सुरू केले. व्यावसाय वाढीसाठी त्यांनी एका फायनान्समधून ५० लाखांचे लोन घेतले होते. पुन्हा पैशांची गरज असल्याने त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत शेखर चिंधे याच्याकडून २५ लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले. परंतु, त्याबदल्यात एका गाळ्यावर त्यांच्याकडून पॉवर ऑफ अँटर्नी करून घेतली. पण, त्यांच्या खात्यावर २५ ऐवजी ५० लाख रुपये आले. दुसरीकडे सबरजिस्टर ऑफिसला चिंधे यांच्या वकिलांनी आधीच तयार केलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या आणि नंतर त्यांचे फोटोही काढले, असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

खात्यावर आलेल्या ५० पैकी त्यांनी २५ लाख रुपये मध्यस्थी असलेल्या व्यक्तीला चेकमार्फत परतही दिले. सातत्याने त्यांनी व्याजाने घेतलेले पैसे देण्यासाठी चिंधे हा दमदाटी करू लागला. तक्रारदार वेळोवेळी त्यांना व्याजाची रक्कम देत होते. यामुळे त्यांनी हा व्यावहार पुर्ण करून विषय मिटविण्याचे ठरविले. नंतर आणखी एका व्यक्तीमार्फत तक्रारदारांनी अमित कलाटे याच्याकडून ३५ लाख रुपये घेतले. त्यांनीही तक्रारदारांच्या दोन्ही दुकानाचे पॉवर ऑफ अँटर्नी करून घेतली. तीही सबरजिस्टर येथून करून घेण्यात आली. त्याचीही कागदपत्रे आधीच तयार करण्यात आली होती. त्यावर फक्त तक्रारदार यांच्या स्वक्षऱ्या व फोटो घेण्यात आले.

काही दिवसांनी तक्रारदारांना समजले की, दोन्ही आरोपींनी तक्रारदार यांची फसवणूक करून कुलमुख्यत्यापत्राचे अगोदरच खरेदीखत करून सावकारी पद्धतीने अधिकची रक्कम वसुल करून दोनी गाळे खरेदीखत करून घेतल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 23 गुन्ह्यांचा लावला छडा; तब्बल…

Web Title: A case has been registered against two people for cheating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Sangli News: सांगलीच्या विश्रामबागेतील कथित बलात्कार प्रकरणानंतर शहरातील कॅफेंवर संताप; श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक
1

Sangli News: सांगलीच्या विश्रामबागेतील कथित बलात्कार प्रकरणानंतर शहरातील कॅफेंवर संताप; श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक

Crime News: धक्कादायक! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; आझाद कॉलेज परिसरातील थरार
2

Crime News: धक्कादायक! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला; आझाद कॉलेज परिसरातील थरार

गर्भलिंगनिदान प्रकरणी केडगावमध्ये मोठी कारवाई, महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या; ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
3

गर्भलिंगनिदान प्रकरणी केडगावमध्ये मोठी कारवाई, महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या; ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिला डॉक्टरला दिलासा; उच्च न्यायालयाच्या आदेशाने मिळणार MBBS पदवी
4

14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिला डॉक्टरला दिलासा; उच्च न्यायालयाच्या आदेशाने मिळणार MBBS पदवी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.