Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमविवाहानंतर पोलिस ठाण्याच्या गेटवर दोन्ही गट भिडले, तुंबळ हाणामारी; 30 जणांवर गुन्हा

प्रेमविवाह केल्यानंतर पोलिस ठाण्यात माहिती देण्यासाठी आलेल्या नवदाम्पत्याच्या कुटुंबीयांमध्ये जोरदार वाद झाला आहे. मुलाकडील आणि मुलीकडील दोन्ही गट पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आमनेसामने आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 31, 2026 | 06:19 PM
प्रेमविवाहानंतर पोलिस ठाण्याच्या गेटवर दोन्ही गट भिडले, तुंबळ हाणामारी; 30 जणांवर गुन्हा

प्रेमविवाहानंतर पोलिस ठाण्याच्या गेटवर दोन्ही गट भिडले, तुंबळ हाणामारी; 30 जणांवर गुन्हा

Follow Us
Follow Us:
  • प्रेमविवाहानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये जोरदार वाद
  • शिरूर पोलिस ठाण्याच्या गेटवर तुंबळ हाणामारी
  • दोन्ही गटांतील ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिक्रापूर : प्रेमविवाह केल्यानंतर पोलिस ठाण्यात माहिती देण्यासाठी आलेल्या नवदाम्पत्याच्या कुटुंबीयांमध्ये जोरदार वाद झाला आहे. मुलाकडील आणि मुलीकडील दोन्ही गट पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आमनेसामने आले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शिरूर पोलिस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तब्बल ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलठण (ता. शिरूर) येथील एका तरुणीने गावातील तरुणासोबत प्रेमविवाह केला. विवाहानंतर नवदाम्पत्याने पोलिसांना माहिती देण्यासाठी शिरूर पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी पोलिस ठाण्याजवळील एसटी स्थानक परिसरात दोन्ही कुटुंबांतील सदस्य एकत्र आले. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक वाद झाला.

परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला. दोन्ही गटांना पोलिस ठाण्यात येऊन तक्रार देण्याची विनंती करण्यात आली. मात्र, काही वेळातच दोन्ही बाजूचे लोक पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ एकाचवेळी जमले. यावेळी पुन्हा वादाला सुरुवात झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील सदस्यांनी एकमेकांवर हल्ला केल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधितांना ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ

पोलिस अंमलदाराच्या फिर्यादीवरून गुन्हा

या प्रकरणी पोलिस अंमलदार सोनू मलीधर तावरे (वय ३०, रा. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गणेश उत्तम लकडे, अक्षय आनंदा शिंदे, माक्का कोळपे, सुनील कोळपे यांच्यासह अनेक जणांची नावे गुन्ह्यात समाविष्ट आहेत. तसेच अनोळखी ११ जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल भागवत करीत आहेत. प्रेमविवाहाच्या पार्श्वभूमीवर दोन कुटुंबांतील वाद थेट पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल, पहिला नंबर त्यांचाच, त्यानंतर…; हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिरूरमध्ये हाणामारीची घटना का घडली?

    Ans: मलठण येथील तरुणीने गावातील तरुणासोबत प्रेमविवाह केला. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली.

  • Que: ही घटना नेमकी कुठे घडली?

    Ans: शिरूर पोलिस ठाण्याजवळील एसटी स्थानक परिसरात वाद सुरू झाला. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.

  • Que: या प्रकरणी किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला?

    Ans: शिरूर पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल भागवत करीत आहेत.

Web Title: A clash between two groups has taken place at the gate of the shirur police station nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Shirur Crime

संबंधित बातम्या

दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ
1

दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले
2

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले

18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
3

18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Pune disctrict Court News: शिवाजीनगर न्यायालयात जोरदार राडा!; शिवीगाळ अन् धक्काबुक्की प्रकरणी ९ जणांना दंड
4

Pune disctrict Court News: शिवाजीनगर न्यायालयात जोरदार राडा!; शिवीगाळ अन् धक्काबुक्की प्रकरणी ९ जणांना दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.