Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ

गेवराई शहरातील शिवाजीनगर परिसरातून एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. गजानन दत्तात्रय गोरे असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 31, 2026 | 03:25 PM
दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ

दोन महिन्यांपूर्वी तरुणाचे अपहरण, आता पोलिसांत तक्रार; गेवराईतील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • गेवराईतून ३६ वर्षीय गजानन गोरे यांचे अपहरण
  • २ ऑगस्ट रोजी घरातून जबरदस्तीने पळवून नेल्याची फिर्याद
  • अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
गेवराई : गेवराई शहरातील शिवाजीनगर परिसरातून एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने जबरदस्तीने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. गजानन दत्तात्रय गोरे असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, तरुणाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी प्रतिभा गजानन गोरे (वय ३२, रा. शिवाजीनगर, कोल्हेर रोड, गेवराई, ता. गेवराई, जि. बीड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान शिवाजीनगर येथील राहत्या घरातून गजानन गोरे यांना अज्ञात व्यक्तीने जबरदस्तीने पळवून नेले.

 

अपहरणामागील कारण गुलदस्त्यात

गजानन गोरे यांना नेमके कोणी आणि कोणत्या कारणासाठी पळवून नेले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेच्या वेळी नेमके काय घडले, अपहरणामागे वैयक्तिक वाद आहे की अन्य काही कारण, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले

दोन महिन्यांनंतर गुन्ह्याची नोंद

या घटनेप्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची तारीख २ ऑगस्ट असून, त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी पोलिसांत अपहरणाची नोंद झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलिस ठाण्याचे कर्मचारी डोळस करीत आहेत. गजानन गोरे यांचा शोध आणि अपहरणामागील कारणांचा उलगडा होण्याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट! एक कर्मचारी गंभीर जखमी; वाहनाचा उडाला चक्काचूर

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यात व छातीवर दगडाने प्रहार करून त्याचा निघृण खून करणाऱ्या आरोपीला बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी ३० ऑक्टोबर रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. व्यंकट बसवंत नक्कावार (वय ३२, रा. हनुमान हिप्परगा, ता. देगलूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, त्याला पाच हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गेवराईतून कोणाचे अपहरण झाले?

    Ans: गजानन दत्तात्रय गोरे (वय ३६) यांचे शिवाजीनगर परिसरातून अपहरण झाल्याची तक्रार आहे.

  • Que: अपहरणाची घटना कधी घडली?

    Ans: २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

  • Que: या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: २९ ऑक्टोबर रोजी गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस कर्मचारी डोळस करीत आहेत.

Web Title: An incident involving the abduction of a young man has taken place in georai nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Beed Police
  • crime news
  • Kidnaped Case

संबंधित बातम्या

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले
1

माहेरून 10 लाख आणण्यासाठी छळ, पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीचे कपडे फाडले; मुलीलाही घराबाहेर काढले

18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

18 लाखांसाठी मित्रावर जीवघेणा हल्ला, नाकाचे हाड फ्रॅक्चर; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Pune disctrict Court News: शिवाजीनगर न्यायालयात जोरदार राडा!; शिवीगाळ अन् धक्काबुक्की प्रकरणी ९ जणांना दंड
3

Pune disctrict Court News: शिवाजीनगर न्यायालयात जोरदार राडा!; शिवीगाळ अन् धक्काबुक्की प्रकरणी ९ जणांना दंड

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या; न्यायालयाने आरोपी भावाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या; न्यायालयाने आरोपी भावाला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.