
तिरुपती या ठिकाणी देवदर्शन करून कारणे हे कुटुंबीय परत येत असताना बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास अचानक एका ट्रकने ब्रेक मारल्याने जगताप यांची कार ट्रकवर जाऊन आढळल्याने हा अपघात झाला. या अपघातात जगताप दांपत्य मयत झाले. तर त्यांची दोन्ही मुले जखमी झाली. स्थानिकांच्या व महामार्ग पोलिसांच्या मदतीने त्यांना हुबळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच जगताप दांपत्याचा मृत्यू झाला होता. त्यांच्या दोन्ही मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Karad Bus Accident: सहलीसाठी गेलेल्या बसचा कराडजवळ भीषण अपघात; २० फूट खड्ड्यात कोसळली, ४५ जण जखमी
दरम्यान बारामती औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या सायबर डायनामिक्स डेअरी इंडस्ट्रीज या मोठ्या कंपनीत जगताप हे प्रोजेक्ट टीमचे प्रमुख म्हणून काम पाहत होते, तर त्यांच्या पत्नी वैशाली या इंजिनीयर असून त्यांचा कॉम्प्युटरचा व्यवसाय आहे. तर मुलगा अथर्व हा गेले दहा दिवसांपूर्वी वैमानिक झाला आहे. तर मुलगी पुण्यातील एका कंपनीत नोकरीस लागली आहे. गेले काही दिवसांपूर्वी जगताप यांच्या वडिलांचे निधन झाले होते. बारामती तालुक्यातील उंडवडी येथील मूळचे रहिवासी असलेले जगताप कुटुंबीय बारामती मध्ये राहत होते. जगताप दांपत्याच्या या अपघाती मृत्यूमुळे उंडवडी तसेच बारामती परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत मनमिळावू असलेले जगताप दांपत्य यांच्या या निधनाने त्यांच्या मित्र परिवारासह बारामतीकर हळहळ व्यक्त करत आहेत. गुरुवारी (दि ४) बारामती मध्ये त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सहलीसाठी गेलेल्या बसचा कराडजवळ भीषण अपघात
महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एक मोठा अपघात समोर आला आहे. कोकणातून परतणाऱ्या नाशिकमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी बसला कराडच्या वाठार परिसरात अपघात झाला. बस नियंत्रणाबाहेर गेली आणि थेट खोल दरीत कोसळली. सुमारे ३० विद्यार्थी जखमी झाले, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. बस महामार्गावरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली कोसळली. त्यात दिवंगत बी.पी. पाटील ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी होते.