ग्राहक बोलविण्यावरुन वाद; दोन मटण दुकान मालकांत हाणामारी
शिरोली : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलिसांकडूनही गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही गस्त घातली जात आहे. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नाही. अशातच आता पुलाची शिरोलीतून एक मोठी घटना समोर आली आहे. ग्राहक बोलविण्यावरुन दोन मटण दुकान मालकांत हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
गावाच्या मध्यभागी मटण मार्केट आहे. या मटण मार्केटमध्ये एखादे ग्राहक आले की आपल्याच दुकानात मटण खरेदी करावे, यासाठी ग्राहकाला बोलवले जाते. यातून मोठी स्पर्धा मटण विक्री करणारे दुकान मालकांत नेहमी सुरू असते. याच कारणावरून रविवारी ग्राहकाला बोलविण्यावरून मुनाफ चिकन सेंटर व विजय मटण शॉप यांच्यात तुफान हाणामारी झाली. या मारामारीत मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे जखमी झाले. याबाबत मुनाफ कवठेकर व विजय घोटणे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.
मुनाफ नजरुद्दीन कवठेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय रंगराव घोटणे, तानाजी रंगराव घोटणे, रणजित विजय घोटणे, सत्यजित तानाजी घोटणे, धैर्यशील विजय घोटणे, गौरव तानाजी घोटणे (सर्व रा. पुलाची शिरोली) यांच्याविरोधात रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
विजय रंगराव घोटणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, मुस्तफा नजरुद्दीन कवठेकर, वहाज कवठेकर,नजरुद्दीन कवठेकर, सुबहान देसाई सर्व (रा. पुलाची शिरोली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. या सर्वांना पेठवडगाव येथील न्यायालयात हजर केले असता विजय रंगराव घोटणे, तानाजी रंगराव घोटणे यांना एक दिवसाची तर मुनाफ नजरुद्दीन कवठेकर, मुस्तफा नजरुद्दीन कवठेकर, नजरुद्दीन कवठेकर यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेचा खून
सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. माण तालुक्यातील राणंद गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर सोमवारी (दि. ८) रात्री एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हिराबाई दाजी मोटे (वय अंदाजे ७५) यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा घरी आल्यानंतर हिराबाई घरात न आढळल्याने संगिता खाशाबा कोळेकर यांनी त्यांच्या भावाला दत्तात्रय दाजी मोटे यांना साडेदहा वाजता ही माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता संगिता आणि त्यांचा मुलगा संतोष रानात गेले असता, त्यांना हिराबाई यांचा मृतदेह पडलेला दिसला. या घटनेनंतर राणंद गावात खळबळ उडाली. जमिनीच्या वादातून हा खून घडल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.