Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावळज स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार! लिंबू, काळे दोरे, कुंकू आढळल्यामुळे नागरिक संतापले

सावळज येथील स्मशानभूमीत लिंबू, काळे दोरे, काळे कापड, कुंकू, अंडी आणि विविध प्रकारच्या पुड्या यांसारखी जादूटोणासाठी वापरली जाणारी सामग्री आढळून आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 11, 2025 | 05:04 PM
सावळज स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार! लिंबू, काळे दोरे, कुंकू आढळल्यामुळे नागरिक संतापले

सावळज स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार! लिंबू, काळे दोरे, कुंकू आढळल्यामुळे नागरिक संतापले

Follow Us
Close
Follow Us:
  • सावळज स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार
  • लिंबू, कुंकू आढळल्यामुळे नागरिक संतापले
  • कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी
तासगाव : तासगाव तालुक्यात अंधश्रद्धेचे सावट भयावहपणे वाढत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. सावळज येथील स्मशानभूमीत लिंबू, काळे दोरे, काळे कापड, कुंकू, अंडी आणि विविध प्रकारच्या पुड्या यांसारखी जादूटोणासाठी वापरली जाणारी सामग्री आढळून आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांच्या स्मशानभूमीचा अशा अनिष्ट कृत्यांसाठी गैरवापर होत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

अलीकडेच वासुंबे (ता. तासगाव) येथेही अशाच प्रकाराची नोंद झाली होती. त्यामुळे तासगाव तालुक्यात अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होते. विज्ञानवादी आणि पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार उघडकीस येणे ही खरोखरच दुर्दैवी व चिंताजनक शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, लिंबू, दोरे, रंग, अंडी या व अशा इतर साहित्याने कोणतेही भानामतीचे किंवा जादूटोण्याचे परिणाम होत नाहीत. या थोतांडांमुळे काहीही बदलत नाही; बदलतो तो फक्त लोकांचा भ्रम, असे विज्ञाननिष्ठ कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. परंतु भीती, अज्ञान आणि निवडणुकीच्या वातावरणातील अफवांमुळे अशा ‘काळ्या विधीं’ना खतपाणी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांचा वापर काहीजण अंधश्रद्धेच्या खेळासाठी करतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अशा कृतींना राजकीय संरक्षण अथवा फायदा मिळत असल्यास त्याची कसून चौकशी करण्याची मागणी होत आहे.

प्रशासन आणि समाजाची तातडीची जबाबदारी

या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पुन्हा अशी घटना न घडण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात प्रबोधनाचे कार्यक्रम राबविणे, शाळांमध्ये विज्ञानाधारित चर्चा आयोजित करणे आणि अंधश्रद्धेविषयी जागृती घडविणे याची मागणी नागरिक व सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.

अंधश्रद्धेविरुद्धची लढाई ही केवळ एका संस्थेची नाही; तो संपूर्ण समाजाचा लढा आहे. सावळजच्या स्मशानभूमीत आढळलेला हा प्रकार या गोष्टीची पुन्हा जाणीव करून देणारा ठरला आहे. भीती नव्हे, विवेक; अंधश्रद्धा नव्हे, विज्ञान अशी मानसिकता निर्माण केल्याशिवाय समाजाची खरी प्रगती शक्य नाही, असा सुर तालुक्यात उमटताना दिसतो आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. सावळजमधील प्रकारानंतर पुरोगामी संघटनांनी मागणी केली आहे की, जादूटोणा करणारे, अफवा पसरवणारे व लोकांना भ्रमित करणाऱ्यांवर तत्काळ या कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. कायद्याची कडक अंमलबजावणीच अंधश्रद्धेला रोखू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Web Title: A form of witchcraft has been revealed in the savalj cemetery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Tasgaon News
  • Tasgaon Police

संबंधित बातम्या

उसाला फुटले तुरे, शेतकरी चिंतेत; कारखान्यांनी वेळेत ऊसतोड करण्याची मागणी
1

उसाला फुटले तुरे, शेतकरी चिंतेत; कारखान्यांनी वेळेत ऊसतोड करण्याची मागणी

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा! Pump Storage Projects साठी मोठे करार; वाचा सविस्तर
2

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा! Pump Storage Projects साठी मोठे करार; वाचा सविस्तर

Tasgaon News : सोलार प्रकल्प रद्द करण्यासाठी बलगवडे ग्रामस्थ आक्रमक; गुरुवारपासून करणार आमरण उपोषण
3

Tasgaon News : सोलार प्रकल्प रद्द करण्यासाठी बलगवडे ग्रामस्थ आक्रमक; गुरुवारपासून करणार आमरण उपोषण

दोन परीक्षा एकाच दिवशी, पुन्हा एकदा गोंधळ; MPSC च्या पूर्वपरीक्षेच्या दिवशीच नेटचा पेपर
4

दोन परीक्षा एकाच दिवशी, पुन्हा एकदा गोंधळ; MPSC च्या पूर्वपरीक्षेच्या दिवशीच नेटचा पेपर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.