कवठेएकंद गावात अलीकडेच झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई केली. या छापेमारीत पोलिसांनी तब्बल ४ लाख ४५ हजार रुपयांचा बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे.
हातनूर (ता. तासगाव) येथील दत्तात्रय नामदेव पवार यांच्या घराजवळून २६ एप्रिल रोजी एक डंपींग ट्रॉली अज्ञाताने चोरून नेली होती. त्यांनी याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
तासगाव शहरातील एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित रजनीकांत भाऊसाहेब देवकुळे (वय ४३) याच्याविरोधात तासगाव पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.