Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…

पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा बायपासवर शुक्रवारी (दि.२६) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2026 | 02:56 PM
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट...

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट...

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा बायपासवर शुक्रवारी (दि.२६) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या दिशेने कुटुंबासह प्रवास करणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरून भरधाव वेगाने रस्त्याबाहेर गेली. त्यानंतर कार दोन ते तीन वेळा पलटी होऊन रस्त्यालगत असलेल्या एका घराच्या पडवीवर जाऊन जोरदार आदळली.

 

अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील नागरिक घराबाहेर धावत आले. कारची झालेली अवस्था पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने कारमधील जखमींना बाहेर काढले आणि मदतकार्य सुरू केले. या अपघातात कारमधील पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अपघातातील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे कारमधील दोन चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला. तीन वर्षांचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित असून, दीड वर्षांच्या बाळाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे घाबरून दोन्ही मुले रडत होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घडवत त्यांना चॉकलेट देऊन, प्रेमाने समजूत काढत शांत केले. या संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे सुद्धा वाचा : कोलकात्यात भीषण अपघात; बांधकाम सुरू असलेले गोदाम कोसळले, 50 जण मलब्याखाली अडकल्याची शक्यता

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या भीषण अपघातात मोठी जीवितहानी टळली. “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” या म्हणीचा प्रत्यय या घटनेत आला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड

संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू

घरच्यांचा निरोप घेत, व्यवसाय वाढविण्याची स्वप्ने उराशी बाळगत सहा जण बुधवारी रात्री दिल्लीकडे निघाले होते. दुसऱ्या दिवशी नव्या मशीनरीची खरेदी करून परत येण्याच्या गप्पा रंगल्या होत्या. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवर गुरुवारी सकाळी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि क्षणार्धात कुटुंबांचे आधारवड हिरावले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. संभाजीनगरात ही बातमी धडकताच व्यापारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

Web Title: A horrific accident has occurred on the alephata bypass along the pune nashik highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Accident
  • Accident News
  • Car Accident

संबंधित बातम्या

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी
1

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

समृद्धीवर ‘ब्रेकडाउन’ वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा
2

समृद्धीवर ‘ब्रेकडाउन’ वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
3

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा कार अपघात;प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट
4

AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा कार अपघात;प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.