खळबळजनक ! पती-पत्नीमधील वाद टोकाला; पतीने गळा दाबून केली पत्नीची हत्या
वर्धा : जमिनीच्या वाटणीच्या वादातून पुतण्याने त्याच्या चुलती आणि चुलतभावाची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपीने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली. या दुहेरी हत्याकांड आणि आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही घटना अल्लीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमसडा गावात शनिवारी (दि. 28) सकाळी 9 वाजता घडली. या प्रकरणात अल्लीपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि नितीन सुभाष मोहिजे (वय 27) असे मृत आई व मुलाचे नावे आहे. दोघांची हत्या केल्यांतर आत्महत्या करणाऱ्या हल्लेखोराचे नाव महेंद्र भाऊराव मोहिजे (वय 47) असे आहे. मोहिजे कुटुंबातील 4 भावंडांची निमसडा गावाला लागूनच वडिलोपार्जित 8 एकर जमीन आहे. या जमिनीच्या वाटणीवरून कुटुंबात वाद सुरू होता. शनिवारी सकाळी मृतक साधना मोहिजे तिचा मुलगा पेरणीसाठी शेतात गेली होती.
दरम्यान, पुतण्या महेंद्र मोहिजे हाही तिथे होता. साधना आणि महेंद्र यांच्यात वाद झाला. प्रकरण इतके वाढले की, महेंद्रने त्याच्या काकूवर हात उचलला. हे पाहून नितीनने महेंद्रला धक्का दिला. वाद वाढत असताना रागाच्या भरात महेंद्रने जवळच असलेल्या कुऱ्हाडीने काकू साधना आणि चुलतभाऊ नितीनवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी महेंद्रनेही विष प्राशन केले
चुलती आणि भावाला मारल्यानंतर आरोपी महेंद्रनेही विष प्राशन केले. ही घटना मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. जखमी नितीन आणि महेंद्रला रुग्णालयात आणण्यात आले. जिथे दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.
महेंद्रने पश्चात्तापातून घेतले विष
शेताच्या वाटणीवरून संतप्त झालेल्या महेंद्रने हा गुन्हा केल्याचे ज्ञात आहे. परंतु, त्यानंतर पश्चात्तापामुळे त्याने शेतातच विष घेतले. त्याला गंभीर अवस्थेत सेवाग्राम रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या खून आणि आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
पोलिस अधीक्षक घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अनुराज जैन, डीवायएसपी राहुल चव्हाण घटनास्थळी पोहोचले. अल्लीपूरचे एसएचओ विजय कुमार घुले यांच्या नेतृत्वात घटनेचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावरून कुन्हाड जप्त करण्यात आली.