Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! झोपेतच पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप करून हत्या; कारण वाचून बसेल धक्का…

पीडितेचे सासरे गजानन धुंदाळे आणि सासू पुष्पा हे रात्री १ वाजता धाव घेत पोलिस-पाटील संदीप गटमणे यांच्या घरी आले व पवनने लक्ष्मीला कुऱ्हाडीने मारले अशी थरारक माहिती दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 09, 2025 | 08:21 AM
कौटुंबिक वादातून संतप्त पतीने केला खून

कौटुंबिक वादातून संतप्त पतीने केला खून

Follow Us
Follow Us:

बुलडाणा : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढताना दिसत आहे. असे असताना आता तालुक्यातील उटी गावात धक्कादायक घटना घडली. सततच्या वादातून उद्भवलेल्या रागाच्या भरात पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

लक्ष्मी पवन धुंदाळे (वय २४) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, आरोपी तिचा पती पवन गजानन धुंदाळे (वय २८) आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री जळगाव जामोदच्या उटी येथे घडली. पीडितेचे सासरे गजानन धुंदाळे आणि सासू पुष्पा हे रात्री १ वाजता धाव घेत पोलिस-पाटील संदीप गटमणे यांच्या घरी आले व पवनने लक्ष्मीला कुऱ्हाडीने मारले अशी थरारक माहिती दिली. तत्काळ पोलिस पाटील घटनास्थळी पोहोचले असता, लक्ष्मी ही खोलीत गादीवर रक्ताच्या थारोळ्यात निपचित अवस्थेत आढळली. मानेच्या मागील बाजूस खोल जखम होती व गादी पूर्णपणे रक्ताने माखलेली होती.

हेदेखील वाचा : Gadchiroli Crime : वेतन वाढ रोखली, शरीरसुखाची मागणी केली, छळाला कंटाळून परिचारिकेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकरण काय?

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित आरोपी पवन याने हत्या केल्याची कबुली दिली. ‘लक्ष्मी मला नेहमी तू काही कामाचा नाहीस, कुठे जाऊन मर’ असे बोलून अपमान करायची. काल रात्रीही तिने शिवीगाळ केली. रागाच्या भरात मी तिला झोप लागल्यानंतर कुऱ्हाडीने वार केला’, असे पवनने पोलिस पाटील यांना सांगितले. माहिती मिळताच पोलिस, अॅम्बुलन्स आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले.

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाची हत्या

दुसऱ्या एका घटनेत, एकतर्फी प्रेमातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. भांडणानंतर मैत्रिणीच्या प्रियकराने त्याच्यावर चाकूने हल्ला करत रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. ही थरारक घटना गणेशपेठ पोलिस ठाण्यांतर्गत गाडीखाना परिसरात घडली. अमन मेश्राम (वय २४, रा. गंगाबाई घाट चौक) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

हेदेखील वाचा : Ahilyanagar News: जामखेड नृत्यांगना आत्महत्या प्रकरणातील आरोपी कोणत्या पक्षाचा? BJP–NCP च्या नेत्यांचे एकमेकांकडे बोट

Web Title: A man murdered his wife with axe incident in buldana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:13 AM

Topics:  

  • Buldana News
  • Murder Case

संबंधित बातम्या

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
1

अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त
2

वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त

चहाविक्रेत्या दाम्पत्याचा अंत अन् अडीच वर्षांची चिमुकली गूढरीत्या गायब; या भयानक कृत्यामागचे रहस्य काय?
3

चहाविक्रेत्या दाम्पत्याचा अंत अन् अडीच वर्षांची चिमुकली गूढरीत्या गायब; या भयानक कृत्यामागचे रहस्य काय?

आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून
4

आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.