Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनगाव मंदिरातील खून प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सोनेश्वर मंदिरात युवराज आबासाहेब थोरात यांचा किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 11, 2025 | 01:31 PM
सोनगाव मंदिरातील खून प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

सोनगाव मंदिरातील खून प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Follow Us
Close
Follow Us:
  • सोनगाव मंदिरातील खून प्रकरणात मोठी अपडेट
  • आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
  • चाकूने भोसकून खून केल्याचा गुन्हा सिद्ध
बारामती : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज खून, हाणामाऱ्या, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत असल्यामुळे नागरिक त्रस्त होत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता बारामती तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सोनेश्वर मंदिरात युवराज आबासाहेब थोरात यांचा किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे.

या खूनप्रकरणी पनिश उर्फ पांग्या आनंद्या भोसले (मूळ रा. सोनगाव, ता. बारामती) याला जन्मठेप (आजन्म कारावास) व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही.सी. बर्डे यांनी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनगाव येथील सोनेश्वर मंदिरात जानेवारी २०२० मध्ये किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत पांग्या याने युवराज आबासाहेब थोरात यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात थोरात यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सूरज युवराज थोरात यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली होती. या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानदेव साहेबराव शिंगाडे यांनी १३ साक्षीदार तपासले. फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे जबाब व सरकारी वकीलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

या खटल्यात सरकार पक्षाला बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तपास अधिकारी प्रमोद पोरे व अण्णासाहेब घोलप, पैरवी अधिकारी गोरख कसपटे, कोर्ट अंमलदार महिला रेणुका पवार यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाला या खटल्यात अ‍ॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांना अ‍ॅड. विनोद जावळे, अ‍ॅड. परिश रूपनवर, विश्वतेज थोरात यांचेही सहकार्य मिळाले.

 

Web Title: The court has sentenced the accused in the songaon temple murder case to a heavy sentence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 01:31 PM

Topics:  

  • Arrested News
  • baramati
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना
1

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना
2

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह
3

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
4

लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.