Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईसोबत पैशांवरून वाद होताच मुलगा नैराश्येत; पाचव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या

Suicide Case : व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पंचवटीतील ढिकलेनगर परिसरात घडली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 01, 2026 | 08:58 AM
इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप गुलदस्त्यात

इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; कारण अद्याप गुलदस्त्यात

Follow Us
Follow Us:

नाशिक : आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या रागातून एका ३८ वर्षीय ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पंचवटीतील ढिकलेनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

देवेंद्र संजय थोरात (वय ३८, रा. निर्माण उपवन, ढिकलेनगर, पंचवटी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २८) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास देवेंद्र थोरात यांचे त्यांच्या आईसोबत पैशांच्या कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. हा वाद विकोपाला गेल्याने देवेंद्र प्रचंड नैराश्येत होते. याच नैराश्येतून मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून थेट खाली उडी मारली. पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने देवेंद्र यांच्या डोक्याला आणि डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

ब्रेकअप झाल्याने फार्मसीची विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच त्यांचे मेहुणे गौरव जयवंत वायकुळ यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी आडगाव नाका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना पहाटे मृत घोषित केले.

पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पंकज सोनवणे, सहाय्यक उपनिरीक्षक दत्तू शेळके यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. मृत देवेंद्र थोरात यांच्या पश्चात आई आणि दोन मुले असा परिवार आहे.

ब्रेकअप झाल्याने तरुणीची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, चंद्रपुरातील एका तरुणीने ब्रेकअप झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे ही घटना घडली. आस्था कुंदन नगराळे (वय २१, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आस्था ही तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने राहत होती. ८ एप्रिलला रात्री १०.३० च्या सुमारास ती घरच्यांचे फोन उचलत नसल्याने आईने नागपूरला असलेल्या नातेवाईकांना कळवले. तिचे चुलत भाऊ प्रणय नगराळे यांनी तातडीने सातगाव गाठले असता आस्थाने रूममधील सीलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचे दृश्य समोर आले.

Web Title: A man committed suicide by jumping from the fifth floor incident in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • crime news
  • Nashik News
  • suicide news

संबंधित बातम्या

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
1

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
3

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
4

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.