
धक्कादायक ! पोलिसांसमोरच कापला स्वतःचा गळा; धारदार शस्त्र हाती घेतलं अन् नंतर...
अमरावती : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात कारवाई तीव्र केलेल्या पोलिसांसमोर एका व्यक्तीने स्वतःचा गळा कापून घेतला. ही घटना सोमवारी (दि.२२) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास नागपुरी गेट पोलिस ठाणे हद्दीतील यास्मीननगर, गल्ली क्रमांक २ येथे घडली. राया घटनेमुळे पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
शेख अकील शेख गफूर (वय ५५) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्राईम ब्रांचचे जवान मंगेश लोखंडे व सतीश देशमुख हे अवैध दारू व्यवसायाविरोधात कारवाईसाठी यास्मीन नगर परिसरात गेले होते. यावेळी शेख अकील याच्या घरावर धाड टाकण्यात आली. दरम्यान, पोलिस कारवाईला विरोध करत शेख अकीलने अचानक धारदार शस्त्राने स्वतःचा गळा कापून घेतला, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जवानांनी तातडीने जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
हेदेखील वाचा : Year Ender 2025 : वर्षभरात अंगावर काटा आणणऱ्या घटना…! कोलकाता सामूहिक बलात्कार, निळा ड्रम हत्याकांडपासून ते सोनम रघुवंशी प्रकरण
दरम्यान, याची माहिती मिळताच क्राईम ब्रांचच्या पोलिस सूत्रांनी मात्र शेख अकीलवर यापूर्वीही अवैध दारू व्यवसायासह अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगितले आहे. यापूर्वीही कारवाईदरम्यान त्याने विद्युत प्रवाहित तार पकडून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
जालन्यात व्यावसायिकाची हत्या
दुसऱ्या एका घटनेत, जालन्यात पैशांच्या वादातून एका व्यावसायिकाची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी रविवारी सहाच्या सुमारास शहरातील अंबड चौफुली येथे एका कारमध्ये व्यासायिक सागर धानोरे यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर समोर आली. हा मृतदेह शेजारी एक पिस्टल आदळून आला होता. त्यामुळे हा प्रकार आत्महत्येचा असलयाचे वाटले होते. परंतु पोलिसांनी कसून तपास आणि तांत्रिक विश्लेषण करत सीसीटीव्हीच्या आधारे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे उघड केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीना देखील अटक केली आहे.
हेदेखील वाचा : Nanded: नांदेडमध्ये राजकीय खळबळ! माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे यांचे अपहरण, जीवघेणी मारहाण; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप