
कन्नड तालुक्यात भरदिवसा एकाची हत्या; सकाळी आठला शेतात गेला अन् नंतर...
कन्नड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील जामडी तांडा (फॉरेस्ट) येथील जंगलात एकाचा दिवसाढवळ्या खून झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
राजू रामचंद्र पवार (वय ४५, रा. जामडी तांडा) असे मृताचे नाव आहे. राजू पवार हे सकाळी ८ वाजता शेतात गेले होते. दुपार झाली तरी ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी मोबाईलवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल बंद असल्याने आणि परिसरात बिबट्याचा वावर असल्याने कुटुंबियांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. राजू पवार घरी आले नाहीत आणि त्यांचा मोबाईलवर संपर्क होत नसल्याची चर्चा तांड्यात आणि गावात पसरल्याने कुटुंबीयांसमवेत ग्रामस्थही त्यांच्या शोध घेण्यासाठी शेताकडे गेले.
हेदेखील वाचा : Delhi Crime : 48 तास, 9000 पोलीस आणि 4299 ठिकाणी छापेमारी, दिल्ली पोलिसांचे गुंडांविरुद्ध ऑपरेशन गँग बस्ट सुरू
दरम्यान, शोध घेत असतानाच राजू पवार यांची चप्पल आणि बाजूलाच मोबाईल हँडसेट फोडलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे ग्रामस्थांनी आणखी कसून शोध सुरु केला. त्यावेळी जंगलात (कंपार्टमेंट नं. १३८) नाल्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. राजू पवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, वडील असा परिवार आहे.
डोक्यावर वार दिसल्याने खुनाचा संशय
राजू पवार यांच्या डोक्यावर तसेच गुप्तांगावर धारदार शस्त्राचे वार दिसल्याने हा खुनाचा प्रकार असल्याने ग्रामस्थांनी घटनेची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्यात कळवली. याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. परिस्थिती पाहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. आता याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
दिल्ली पोलिसांचे गुंडांविरुद्ध ऑपरेशन गँग बस्ट
राजधानीत वाढत्या गुंडांच्या नेटवर्क आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दिल्ली पोलिसांनी “ऑपरेशन गँग बस्ट” सुरू केले. पश्चिम आणि उत्तर श्रेणीतील स्पेशल सेलच्या पथकांचा समावेश असलेली ही कारवाई ४८ तास चालली. गुन्हेगारांना आश्चर्यचकित करण्यासाठी रणनीती वापरून पोलिसांनी शहरातील विविध भागात एकाच वेळी छापे टाकले. टोळी मॉड्यूल उध्वस्त करणे आणि हिंसक गुन्हेगारीला आळा घालणे हे उद्दिष्ट होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. मोठ्या संख्येने अटक करण्यात आली. २४ तासांनंतरच गुन्हेगारांनी दिल्लीला पुन्हा एकदा धोका निर्माण केला.
हेदेखील वाचा : Pune Crime News : 9 वर्षांनंतर लागला तिहेरी हत्याकांडचा निकाल; अखेर त्या 10 आरोपींना जन्मठेपची शिक्षा