Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्…

फैजान याने आयडी देण्यास नकार दिला. त्यावेळी चिडून जाऊन संशयित अल्पवयीन मुलगा तसेच शहाबाद उर्फ छोटा पठाण या दोघांनी फैजान याच्या डोक्यात, छातीवर, पाठीवर तसेच डाव्या हातावर चाकूने वार केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 06, 2025 | 12:53 PM
मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्...

मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा आला राग; अल्पवयीन मुलावर चाकूने वार केला अन्...

Follow Us
Follow Us:

कराड : शहरातील मुजावर कॉलनीत मुलीचा इन्स्टाग्राम आयडी न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर चाकूने वार करण्यात आले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. फैजान फैयाज बारगीर (वय 15, रा. दौलत कॉलनी, कराड) असे चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शहाबाद उर्फ छोटा इस्माईल पठाण (वय 30, रा. मुजावर कॉलनी, कराड) याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील दौलत कॉलनीत राहणार्‍या फैजान बारगीर या अल्पवयीन मुलाला मुजावर कॉलनीतील शहाबाद उर्फ छोटा पठाण आणि अन्य एका मुलाने चौकात बोलावले. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फैजान हा घरात असताना मुजावर कॉलनीतील संबंधित अल्पवयीन मुलाने त्याच्या इन्स्टाग्रामवर शिवीगाळीचे मेसेज पाठवून ‘तू चौकात ये तुला दाखवतो’, असा मेसेज केला. तसेच फोन करून मुजावर कॉलनीतील चौकात येण्यास सांगितले.

हेदेखील वाचा : Latur Crime : व्याजाच्या वादातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला, संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

त्यानुसार, फैजान हा चौकात गेला असता संबंधित अल्पवयीन मुलाने त्याच्याकडे एका मुलीचा इन्स्टाग्राम आयडी मागितला. मात्र, फैजान याने आयडी देण्यास नकार दिला. त्यावेळी चिडून जाऊन संशयित अल्पवयीन मुलगा तसेच शहाबाद उर्फ छोटा पठाण या दोघांनी फैजान याच्या डोक्यात, छातीवर, पाठीवर तसेच डाव्या हातावर चाकूने वार केले. त्यामध्ये फैजान जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

व्याजाच्या पैशांसाठी तरुणावर हल्ला

व्याजासह पैसे परत करून देखील अतिरिक्त व्याजाची मागणी पूर्ण न केल्याने एका तरुणावर तलवार, काठी आणि दगडांनी हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे. ही घटना लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नाईक चौकात घडली.

Web Title: A minor boy attempt to murder due to minor reason incident in karad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • crime news
  • Karad Crime
  • Karad news

संबंधित बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…
1

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
2

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?
3

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले
4

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.