Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित पवारांच्या PA च्या लेकीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात एकच खळबळ

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २३) उघडकीस आली आहे. आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांची ती कन्या आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 23, 2026 | 04:13 PM
रोहित पवारांच्या PA च्या लेकीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात एकच खळबळ

रोहित पवारांच्या PA च्या लेकीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात एकच खळबळ

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. २३) उघडकीस आली आहे. रुई हद्दीतील स्वामी समर्थ रेसिडेन्सी इमारतीच्या परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवनी अजित दशावतारे (वय १४) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांची ती कन्या आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २२) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांनी मुलीला रागावल्याने ती घरातून निघून गेली होती. बराच वेळ शोध घेऊनही ती आढळून न आल्याने कुटुंबीय रविवारी पहाटे ३.४० वाजता बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. नाईट राउंड अधिकारी बापू कांबळे यांनी मुलीच्या वडिलांसह परिसरात शोध घेतला. मात्र, मुलगी न मिळाल्याने वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. ४०१/२०२६, कलम १३७(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, शोध सुरू असताना डायल ११२ चे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा कांबळे यांना रुई हद्दीतील स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मयत अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन नातेवाईकांच्या मदतीने ओळख पटवली असता तीच हरवलेली मुलगी असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक नारायण पवार ,पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टीम तसेच डिटेक्शन ब्रांचच्या तीन पथकांना पाचारण करून तपास सुरू करण्यात आला. इमारतीच्या टेरेसची पाहणी केली असता दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळले. शिडीच्या सहाय्याने टेरेसवर प्रवेश केल्यानंतर तेथे मयत मुलीची चप्पल आढळली. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी रात्री ९.५८ वाजता लिफ्टने वर गेल्याचे दिसून आले. तिच्या शरीरावर खरचटल्याच्या जखमा असून डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक तपासात परिस्थितीजन्य पुराव्यांवरून मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत करीत आहेत. दरम्यान या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी मेडिकल कॉलेज महाविद्यालयात येऊन घटनेची माहिती घेऊन दशावतारे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

हे सुद्धा वाचा : पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

Web Title: A minor girl has committed suicide by jumping from a building in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • baramati news
  • MLA Rohit Pawar
  • Sucide

संबंधित बातम्या

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह
1

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध
2

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.