Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लालपरीची ‘सत्तर हजारी’ धाव; शिवाजीनगर आगाराचा विक्रम, STच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक नोंद

दिवाळीच्या गर्दीत शिवाजीनगर एसटी आगाराने विक्रमी कामगिरी करत एका दिवसात १६७ बसद्वारे तब्बल ७०,१९२ किमी अंतर कापले. एसटीच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक एकदिवसीय धाव म्हणून या कामगिरीची नोंद झाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 18, 2026 | 08:07 PM
Shivajinagar depot records 70 thousand kilometers highest in history

Shivajinagar depot records 70 thousand kilometers highest in history

Follow Us
Follow Us:
  • लालपरीने पहिल्यांदाच पूर्ण केले ७० हजार किलोमीटर अंतर
  • दिवाळीच्या गर्दीत शिवाजीनगर आगाराचा विक्रम
  • १६७ बसनी एका दिवसात कापले ७०,१९२ किमी
पुणे, शहर प्रतिनिधी : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाण्यासाठी प्रवाशांनी एसटी बसला मोठी पसंती दिल्याने शिवाजीनगर आगाराच्या वाहतुकीत विक्रमी वाढ झाली. प्रवाशांची वाढती गर्दी आणि जादा बसफेऱ्यांचे नियोजन यामुळे पाच नोव्हेंबरला शिवाजीनगर आगाराने एका दिवसात तब्बल ७० हजार १९२ किलोमीटर अंतर कापले. राज्यातील एसटी आगारांमध्ये एका दिवसात नोंदविलेले हे सर्वाधिक अंतर ठरले आहे. या दिवशी आगाराला प्रवासी वाहतुकीतून ४९ लाख ४७ हजार ९९८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

शिवाजीनगर आगारातून दररोज साधारण ६० ते ६३ हजार किलोमीटर अंतर बसच्या माध्यमातून कापले जाते. मात्र, दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्याने बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. परिणामी, नेहमीच्या तुलनेत सुमारे सात ते दहा हजार किलोमीटर अधिक अंतर बसनी पार केले.

दिवाळीच्या काळात शिवाजीनगर आगाराने सलग सहा दिवस ६६ हजार ते ७० हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापले. एक नोव्हेंबरला ६६ हजार ३८४, दोन नोव्हेंबरला ६६ हजार, तीन नोव्हेंबरला ७० हजार १८४, चार नोव्हेंबरला ६६ हजार ६७१, तर पाच नोव्हेंबरला ७० हजार १९२ किलोमीटरची नोंद झाली. सहा नोव्हेंबरला ६७ हजार ६४ किलोमीटर अंतर बसनी पार केले. शिवाजीनगर आगारातून लालपरीसह शिवशाही, शिवनेरी, हिरकणी, जनशिवनेरी आणि शयनयान अशा विविध प्रकारच्या बस प्रवाशांच्या सेवेत होत्या.

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”

आगारातून दररोज सकाळी सात वाजता इंदूरसाठी बस सोडली जाते. शिवाजीनगर ते इंदूर हे सुमारे ६८० किलोमीटरचे अंतर असून, आगारातून धावणारी ही सर्वांत लांब पल्ल्याची बस आहे. याशिवाय अमरावती, अकोला, नागपूर, धुळे आणि यवतमाळ या शहरांसाठीही लांब पल्ल्याच्या बस सोडण्यात येतात.

 दिवाळीत एसटीची विक्रमी धावपळ आकडे किमीमध्ये
१ नोव्हेंबर ६६,३८४
२ नोव्हेंबर ६६,०००
३ नोव्हेंबर ७०,१८४
४ नोव्हेंबर ६६,६७१
५ नोव्हेंबर ७०,१९२
६ नोव्हेंबर ६७,०६४

शिवाजीनगर आगाराचा विक्रम एका दृष्टिक्षेपात :

  • विक्रमाची तारीख : ५ नोव्हेंबर २०२६
  • एका दिवसात धावलेल्या बस : १६७
  • एकूण कापलेले अंतर : ७०, १९२ किमी
  • एका दिवसाचे उत्पन्न : ४९ लाख ४७ हजार ९९८ रुपये
  • नेहमीचे दैनंदिन अंतर : ६० ते ६३ हजार किमी
  • आगारात मुक्कामी बस : ११५
  • सर्वांत लांब पल्ल्याचा मार्ग : पुणे ते इंदूर (६८०
    किमी)

    याबाबत शिवाजीनगर वरिष्ठ आगारप्रमुख संजय वाळवे म्हणाले, “शिवाजीनगर आगारातून दररोज साधारण ६० ते ६३ हजार किलोमीटरचा प्रवास होतो. दिवाळीदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे पाच नोव्हेंबरला ७० हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास झाला. आजपर्यंतची ही राज्यातील सर्वाधिक किलोमीटरची नोंद आहे.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवाजीनगर एसटी आगाराने दिवाळीत एका दिवसात किती किमी अंतर कापले?

    Ans: शिवाजीनगर आगारातील १६७ बसांनी एका दिवसात तब्बल ७०,१९२ किमी अंतर कापले.

  • Que: एसटीचा हा विक्रम कशामुळे महत्त्वाचा आहे?

    Ans: एसटीच्या इतिहासात राज्यातील सर्वाधिक एकदिवसीय धाव म्हणून या कामगिरीची नोंद झाली आहे.

  • Que: शिवाजीनगर आगाराची विक्रमी धाव कधी झाली?

    Ans: दिवाळीच्या काळातील प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या अतिरिक्त फेऱ्या सुरू असताना शिवाजीनगर आगाराने ही विक्रमी कामगिरी केली.

Web Title: Shivajinagar depot records 70 thousand kilometers highest in history of st state nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • Bus Service
  • pune news
  • st bus news

संबंधित बातम्या

Sinhgad Institutes: पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का; नवलेंच्या अडचणी वाढल्या? १३ शाळांवर प्रशासक नियुक्त
1

Sinhgad Institutes: पुण्यातील सिंहगड संस्थेला मोठा धक्का; नवलेंच्या अडचणी वाढल्या? १३ शाळांवर प्रशासक नियुक्त

Bharat Taxi News: भारत टॅक्सी’च्या सारथी बनल्या ३०० महिला; पुण्यात सेवेला वाढता प्रतिसाद; चालकांची संख्या ६० हजारांवर
2

Bharat Taxi News: भारत टॅक्सी’च्या सारथी बनल्या ३०० महिला; पुण्यात सेवेला वाढता प्रतिसाद; चालकांची संख्या ६० हजारांवर

दिलासादायक ! पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय तूर्त नाहीच; फक्त गुरुवारी पुरवठा बंद
3

दिलासादायक ! पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय तूर्त नाहीच; फक्त गुरुवारी पुरवठा बंद

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू
4

MSEDCL Launches Abhay Yojana: बारामती परिमंडलातील २.८१ लाख ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ लागू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.