Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीच्या बाबुराव चांदेरेंकडून नागरिकाला मारहाण; उचलून आदळलं, डोकं फोडलं अन्…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 27, 2025 | 02:37 PM
अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीकडून नागरिकाला मारहाण; उचलून आदळलं, डोकं फोडलं अन्...

अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीकडून नागरिकाला मारहाण; उचलून आदळलं, डोकं फोडलं अन्...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी विजय रौंदळ नावाच्या व्यक्तीला ही मारहाण केली आहे. चांदेरे यांनी रौंदळ यांना उचलून जमीनीवर आदळलं आहे. शिवाय त्यांचं डोकं फोडल्याची माहिती देखील मिळत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कोणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. त्यांना फोन केला होता, त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे. की, जो प्रकार झाला आहे, ते मला आवडलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

दमानिया यांचा निशाणा

अजित पवार, काय चालू आहे तुमच्या पक्षात? दिवसा ढवळ्या तुमच्या पक्षाचे नेते बाबूराव चांदेरे यांनी नागरिकाला मारहाण केली आणि अजून कारवाई नाही? बीड जिल्ह्यात असणारे सर्वत्र महाराष्ट्रात हे चालू आहे, राजकारणाच्या जीवावर दादागिरी. हा पुरावा बास का आणि पुरावे पाहिजे गुन्हा दाखल करायला ? काय एक्शन घेणार तुम्ही? तुम्ही पुण्याचे पालक मंत्री आहात आणि बीड चे देखील आहात. तुमच्या नेत्यांची ही गुंडगिरी बंद करा? असं म्हणत अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

नेमकं प्रकरण काय?

बांबुराव चांदेरे हे माजी नगरसेवक असून ते पुणे महानगरपालिकेच्या समितीचे माजी अध्यक्ष आहेत. चांदेरे यांनी विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याने त्यांचा हा व्हिडीओ शूट केला त्यालासुद्धा ते दमदाटी करताना दिसले. जमिनीच्या वादामधून त्यांनी हा मारहाण केल्याची माहिती समजत आहे. ज्यावेळी मारहाण झाली तेव्हा अधिकारी आणि ठेकेदार उपस्थित होते. या व्हिडीओवरून राष्ट्रवादीचे नेते दादागिरी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा : बारामती हादरली! भांडण सोडवणं पडलं महागात; तरुणावर कोयत्याने वार

Web Title: A person close to ajit pawar has beaten up a citizen in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 12:42 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • pune news

संबंधित बातम्या

Nashik News : धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला अन्…, नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, कसबे सुकेणे येथील घटना
1

Nashik News : धारदार नायलॉन मांजा गळ्याला अडकला अन्…, नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार जखमी, कसबे सुकेणे येथील घटना

Pune Election : पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडी? मत्वाच्या बैठकीला शरद पवार गटाची दांडी
2

Pune Election : पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडी? मत्वाच्या बैठकीला शरद पवार गटाची दांडी

Pune Election : ए बी फॉर्म हॉटेलमध्ये की कार्यालयात देणार? उमेदवारांसह पक्षप्रमुखांची लागणार कसोटी
3

Pune Election : ए बी फॉर्म हॉटेलमध्ये की कार्यालयात देणार? उमेदवारांसह पक्षप्रमुखांची लागणार कसोटी

Daund Taluka News: रोटीतील जावळ विधीवरून दौंड तालुक्यात संताप; रूपाली चाकणकरांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
4

Daund Taluka News: रोटीतील जावळ विधीवरून दौंड तालुक्यात संताप; रूपाली चाकणकरांनी माफी मागावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.