संग्रहित फोटो
पोलिसांनी केलेल्या दाव्यांनुसार हल्ल्यातील प्रत्यक्ष हल्लेखोर आणि सुपारी देणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच हल्लेखोरांना सत्तूर आणि पैसे पुरवल्याचेही समोर आले आहे. मात्र, जर हा गोळीबाराचा हल्ला होता, तर मग घटनास्थळावरून गोळीची पुंगळी का गायब झाली ? आणि पोलिसांनी ज्या कांबळे नावाच्या व्यक्तीकडे चौकशी केली, त्याने पिस्तूल पुरवल्याचा इन्कार केला आहे. मग जर पिस्तूल वापरले गेले होते, तर ते या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवले कोणी ? या अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नाचे उत्तर पोलिसांकडे अद्याप नाही. समजा, हल्लेखोरांच्या दाव्यानुसार, पिस्तूल वापरलेच नाही तर घटनास्थळावर पिस्तूल आले कोठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हल्ल्यामागील साखळी, सुपारी देणारे आणि आरोपी हाती लागूनही मुख्य शस्त्रच पोलिसांना शोधता आलेले नाही, हा तपासातील मोठा गोलमाल मानला जात आहे. सत्तूर व पैसे देणाऱ्याने पिस्तूल देण्याचे नाकारल्याने, या प्रकरणात पोलिस खरी माहिती लपवत आहेत की गुन्हेगारांचे धागेदोरे शोधण्यात यंत्रणा हतबल ठरली आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
पोलिस अजूनही काही संशयितांच्या मागावर आहेत आणि नवीन नावे समोर येत आहेत. मात्र, जोपर्यंत हल्ल्यात वापरले गेलेल्या ‘पिस्तुलाचा खरा स्रोत’ उघड होत नाही, तोपर्यंत पोलिसांची ही कारवाई वरवरची आणि दिशाभूल करणारी तर नाही ना, असा संशय सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. एकूणच, आरोपी गळाला लागले असले तरी हल्ल्यातील शस्त्राचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान अजूनही पोलिसांसमोर कायम आहे.
Ans: पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.
Ans: हल्ल्यात पिस्तूल वापरले का आणि ते कोणी पुरवले, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
Ans: हल्ल्यात वापरलेल्या शस्त्राचा स्रोत शोधणे आणि हल्ल्यामागील संपूर्ण साखळी उघड करणे.






