Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएमपीएमएल बसच्या धडकेत सफाई कामगाराचा मृत्यू, संघटना आक्रमक; 10 लाख रुपये भरपाईची मागणी

पौड रोड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून घंटागाडीवर कचरा वेचक म्हणून कार्यरत असलेले मोहन पाराजी जगधने यांचा पीएमपीएमएल बसच्या धडकेत झालेल्या गंभीर अपघातानंतर मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2026 | 02:38 PM
24 तासांनी उलगडले आंबेनळी घाटातील मृत्यूचे रहस्य; मोबाईल लोकेशनमुळे लागला सुगावा

24 तासांनी उलगडले आंबेनळी घाटातील मृत्यूचे रहस्य; मोबाईल लोकेशनमुळे लागला सुगावा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, पौड रोड परिसरात गेल्या १५ वर्षांपासून घंटागाडीवर कचरा वेचक म्हणून कार्यरत असलेले मोहन पाराजी जगधने (वय ४३, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, कोथरूड) यांचा पीएमपीएमएल बसच्या धडकेत झालेल्या गंभीर अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कचरा वेचकांच्या सुरक्षिततेचा आणि सामाजिक संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

२४ एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कोथरूड येथील सह्याद्री हॉस्पिटलजवळ स्मिता एक्स्पर्टसमोर ही दुर्घटना घडली आहे. मोहन जगधने घंटागाडीवर काम करत असताना मागून आलेल्या पीएमपीएमएल बसने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ते खाली पडून गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला व मेंदूला गंभीर इजा झाली होती. अपघातानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले, मात्र रुग्णालयात ५० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागली. ही रक्कम कुटुंबीयांनी उसनवारी करून जमा केली. तब्बल २७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २१ मे रोजी रात्री मोहन जगधने यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि दोन मुलगे असा परिवार असून, पत्नीही कचरा वेचक म्हणून काम करतात.

पीएमपीएमएल प्रशासनावर तीव्र नाराजी

या घटनेनंतर कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने पीएमपीएमएल प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका कष्टकरी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर केवळ ५० हजार रुपयांची मदत देण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित संवेदनशीलता दाखवली नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

“कचरा वेचक शहर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, तरीही त्यांच्या सुरक्षितता आणि आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. या मृत्यूमुळे त्यांच्या सामाजिक संरक्षणाचा मुद्दा गंभीरपणे पुढे आला आहे. – योगेश मंजुळा, सरचिटणीस.

अंशदायी आरोग्य योजना लागू करावी

संघटनेने मोहन जगधने यांच्या कुटुंबाला तातडीने १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची तसेच पुणे महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे कचरा वेचकांसाठी अंशदायी आरोग्य योजना लागू करण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे विद्यापीठात 133 कंत्राटी प्राध्यापकांची भरती, दरमहा 50 हजार रुपये मानधन; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Web Title: A sanitation worker died after being hit by a pmpml bus in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Accident News
  • PMPML Bus
  • pune news

संबंधित बातम्या

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत
1

Accident News: कंटेनरच्या चाकात अडकली दुचाकी; ३ किमी फरफटत गेली, आईसह दोन चिमुकल्यांचा करुण अंत

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
2

Accident News: रस्ता समजून पुढे गेले अन् थेट गटारीत कोसळले; ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
3

Accident News: भरधाव कारला डंपरची भीषण धडक; मध्यरात्रीच्या अपघातात चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
4

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.