Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा ‘तो’ कॉलर रडारवर

आत्पकालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'डायल ११२' या हेल्पलाइनचा काही रिकामटेकड्यांकडून गैरवापर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2026 | 01:28 PM
आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा 'तो' कॉलर रडारवर

आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा 'तो' कॉलर रडारवर

Follow Us
Follow Us:

नाशिक : आत्पकालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डायल ११२’ या हेल्पलाइनचा काही रिकामटेकड्यांकडून गैरवापर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ‘आली लहर आणि केला कहर’ या अविर्भावात एका अज्ञात व्यक्तीने सातपूर एमआयडीसी भागात खून झाल्याची खोटी माहिती देऊन रविवारी (दि. २) दुपारी थेट पोलिसांचीच धावपळ उडवून दिली. शासकीय यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या या खोडसाळ कॉलरविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील नाशिकमधील ही अशी दुसरी घटना असल्याने खळबळ उडाली आहे.

कॉल आला, पोलिसही घटनास्थळी पण सर्वत्र शांतता

रविवारी (दि. ३) दुपारी १ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ८८३०३३४८३४ या मोबाईल क्रमांकावरून ‘डायल ११२’ वर एक कॉल आला. सातपूर एमआयडीसीमधील ‘श्री गजानन ऑटोमोबाईल’ येथे एका व्यक्तीचा खून झाला असल्याची गंभीर माहिती या कॉलरने दिली. नियंत्रण कक्षाकडून संदेश मिळताच सातपूरचे ‘टाऊन बीटमार्शल’ तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खातरजमा केली असता, तिथे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे आणि तो कॉल पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

यंत्रणा वेठीस धरल्याने गुन्हा दाखल

महत्त्वाच्या आत्पकालीन घटनांसाठी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मदतीसाठी असलेल्या शासकीय यंत्रणेचा खोडसाळपणे गैरवापर करून पोलिसांना विनाकारण धावपळ करायला लावल्याप्रप्रकरणी पोलिसांनी या कॉलरविरोधात कडक पाऊल उचलले आहे. सातपूर पोलिस ठाण्याचे अंमलदार चव्हाण (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : बावधन पोलिसांकडून वाहनचोरीच्या टोळीचा पर्दाफाश, तीन आरोपींसह विधिसंघर्षित बालक ताब्यात; तब्बल ‘इतक्या’ दुचाकी जप्त

अज्ञात मोबाईलधारकाचा शोध सुरू

मागील काही दिवसांत शहरात पोलिसांना खोट्या गुन्ह्यांची माहिती देऊन संभ्रम निर्माण करण्याची ही दुसरी घटना घडली आहे. अशा प्रकारांमुळे खऱ्या गरजूंपर्यंत वेळेत मदत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो. या गंभीर बाबीची दखल घेत सातपूर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाच्या मालकाचा माग काढण्यास सुरुवात केली असून, किशोर बेंडकुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Web Title: A search is underway for the accused who provided false information to the police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • crime news
  • Nashik Crime
  • Police News

संबंधित बातम्या

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
1

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
2

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
3

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
4

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.