Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

लग्नाच्या खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेला ३१ वर्षीय एचआर व्यावसायिक गुरुग्रामला माजी सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेला आणि त्यानंतर बेपत्ता झाला. पाच दिवसांच्या शोधानंतर त्याच्या कथित हत्येचा धक्कादायक उलगडा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी माजी सहकारी अन्या वत्स आणि तिचा साथीदार संयम सचदेवा यांना अटक केली असून, आर्थिक वादातून हत्या झाल्

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 18, 2026 | 04:30 PM
Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या खरेदीला गेला अन् हत्या
  • पाच दिवसांनी हत्येचा उलगडा
  • सीडीआरमधून आरोपींचा शोध 
दिल्ली : लग्नाच्या खरेदीसाठी घरातून बाहेर पडलेल्या ३१ वर्षीय एचआर व्यावसायिकाची कथित हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युवराज सिंग मनचंदा असे मृत तरुणाचे नाव आहे. माजी सहकारी अन्या वत्स आणि तिचा साथीदार संयम सचदेवा यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप असून, दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या हत्येमागे आर्थिक वाद असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पाच दिवसांपासून होता बेपत्ता

पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज ६ सप्टेंबर रोजी दिल्लीतील लाजपत नगर येथील सेंट्रल मार्केटमध्ये बहिणीसोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेला होता. त्यानंतर त्याने गुरुग्राममध्ये मीटिंग असल्याचे बहिणीला सांगितले आणि रात्री १० वाजेपर्यंत घरी परतण्याचे सांगितले. मात्र, युवराज घरी परतला नाही. त्याचा मोबाईलही बंद असल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. पाच दिवसांनंतरही त्याचा ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

हेही वाचा : Accident News: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कारची ट्रकला जोरदार धडक , २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू 

सीडीआरमधून माजी सहकाऱ्याचा धागा

तपासादरम्यान युवराजच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात आला. त्यातून युवराजने त्याची पूर्वीची कार्यालयीन सहकारी अन्या वत्स हिच्याशी संपर्क साधल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी अन्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तपासाची दिशा तिच्याकडे वळली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान अन्या आणि संयम यांची चौकशी करण्यात आली. दोघांनी युवराजच्या हत्येत सहभाग असल्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

हेही वाचा : Thane Crime: ठाण्यात नात्याला काळिमा; धमकीमुळे तरुणी गप्प, पाच-सहा महिने भावांकडून वारंवार अत्याचार अन्…

मृतदेह गटारात टाकल्याचा आरोप

पोलिसांच्या माहितीनुसार, युवराज आणि आरोपींमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद झाला होता. त्यानंतर त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह काही तास क्रेटा कारमध्ये ठेवण्यात आला आणि नंतर गुरुग्राममधील सेक्टर ७० परिसरातील गटारात टाकल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपी उत्तराखंडला पळून गेल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी उत्तराखंडमधून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रमाबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

Web Title: Delhi crime 31 year old hr professional yuvraj manchanda murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • crime news
  • crime news delhi
  • delhi
  • Missing Case

संबंधित बातम्या

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
1

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
3

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.